Join us
Daily Top 2Weekly Top 5

करण जोहर करणार 'कुछ कुछ होता है'चा रिमेक, 'या' कलाकारांना कास्ट करण्याची व्यक्त केली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:37 IST

Kuch Kuch Hota Hai Remake : करण जोहर दिग्दर्शित 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसले होते. तिघांनीही आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्वांना प्रभावित केले होते. करण जोहरने नुकतेच चित्रपटाच्या रिमेकबद्दल भाष्य केले.

करण जोहर दिग्दर्शित 'कुछ कुछ होता है' आजही लोकांच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे. या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसले होते. तिघांनीही आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्वांना प्रभावित केले होते. करण जोहरने नुकतेच चित्रपटाच्या रिमेकबद्दल भाष्य केले. त्याने सांगितले की, ते 'कुछ कुछ होता है'च्या रिमेकमध्ये रणबीर कपूर, दीपिका पादुकोण आणि कियारा अडवाणी यांच्यासारख्या टॉप स्टार्सना कास्ट करणार नाहीत.

करण जोहरने सानिया मिर्झासोबत 'कुछ कुछ होता है' चित्रपटाबद्दल चर्चा केली. करण म्हणाला की, आलिया भट मॉडर्न अंजली, रणवीर सिंग राहुल आणि अनन्या पांडे टीना असू शकतात. तो म्हणाला की, जान्हवी कपूर आणि सारा अली खान देखील टीनाच्या भूमिकेत चांगल्या दिसतील.

घराणेशाहीवर बोलला करण जोहरघराणेशाहीबद्दल बोलताना करण म्हणाला की, "मला माहित आहे की हे 'नेपो बेबीज' आहेत. मी यांना माझ्यासमोर मोठे होताना पाहिले आहे, पण त्यांच्या पालकांनी मला कधीही फोन केला नाही. मीच नेहमी त्यांना फोन केला आहे." करणने हे देखील सांगितले की काही कलाकारांनी त्यांच्या ऑफर नाकारल्या होत्या. करण जोहर सध्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेल्या चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. तो 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' हा चित्रपट बनवत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Karan Johar wants to remake 'Kuch Kuch Hota Hai'; casts revealed.

Web Summary : Karan Johar considers remaking 'Kuch Kuch Hota Hai' with Alia Bhatt, Ranveer Singh, and Ananya Pandey. Janhvi and Sara are also considered. Johar addressed nepotism, clarifying that he approaches star kids himself. He's currently busy with Dharma Productions' film 'Tu Meri Main Tera'.
टॅग्स :करण जोहरआलिया भटरणवीर सिंगअनन्या पांडे