Join us  

करण जोहरच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'या' प्रतिष्ठित पुरस्काराने होणार सम्मानित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 2:43 PM

करण जोहरला मिळणार प्रतिष्ठित आशियाई पुरस्कार

करण जोहर (Karan Johar) बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतला निर्माता, दिग्दर्शक आहे. गेल्या ३० वर्षांपासून तो इंडस्ट्रीत आहे. आतापर्यंत त्याने अनेक दर्जेदार चित्रपट केलेत. आता करण जोहरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. गोल्ड हाऊसने बहुप्रतिक्षित तिसऱ्या वार्षिक गोल्ड गालाची घोषणा केली आहे. गोल्ड हाऊस (Gold House Gala) हा आशियातील प्रभावशाली लोकांना प्रोत्साहन देणारा सांस्कृतिक मंच आहे. 

11 मे 2024 रोजी लॉस एंजिलिस शहरात आयोजित प्रतिष्ठित संगीत केंद्र समारोहात तारेतारकांची गर्दी पाहायला मिळणार आहे. ६०० पेक्षा जास्त प्रतिष्ठित पाहुणे या समारोहासाठी एकत्र येतात. यंदाच्या कार्यक्रमात 2024 A100 सूचीचं अनावरण केलं जाईल. यामध्ये गेल्या वर्षीच्या आशियाई प्रशांत संस्कृती आणि समाजात १०० पेक्षा जास्त प्रभावशाली परिवर्तनकर्त्यांचा सम्मान केला जातो. याच कार्यक्रमात करण जोहरचा गौरव केला जाणार आहे. मनोरंजनसृष्टीतील त्याच्या योगदानासाठी त्याला गोल्ड लीजेंड देऊन सम्मान दिला जाणार आहे.

करण जोहरने १९९६ साली आलेल्या 'कुछ कुछ होता है' सिनेमातून दिग्दर्शनाला सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वी त्याने दिग्दर्शित केलेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' प्रदर्शित झाला. तसंच त्याने निर्मिती केलेले 'योद्धा', 'ए वतन मेरे वतन' सारखे दर्जेदार सिनेमेही रिलीज झाले. त्याच्या योगदानाची दखल घेत त्याला हा महत्वपूर्ण सम्मान मिळत आहे. यामुळे करणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

टॅग्स :करण जोहरबॉलिवूडसिनेमा