करण जोहर सिनेसृष्टीतला सर्वात प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आहे. सानिया मिर्झाच्या 'सरव्हिंग इट अप विद सानिया' पॉडकास्टवर करण जोहरने हजेरी लावली होती. यावेळी करणने अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी त्याने काही वैयक्तिक गोष्टीही सांगितल्या. करण त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे आजही अविवाहित आहे. त्यावर तो म्हणाला की मेरे लिए रब ने जोडी बनाई नही है.
सानिया मिर्झाला दिलेल्या मुलाखतीत करण जोहर म्हणाला, "एक वेळ अशी होती जेव्हा मला खरोखरंच प्रेमात पडायचं होतं. प्रेम करायचं होतं. मला सोबत हवी होती नातं हवं होतं. मी अनेक कठीण प्रसंगांमधून गेलो आहे. प्रेमभंगापासून ते एकतर्फी प्रेम या सर्व गोष्टी अनुभवल्या आहेत. मी यावर एक सिनेमाही बनवला होता. मला आनंद आहे की यामुळेच मी त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलो शकलो."
तो पुढे म्हणाला, "अनेकांनी मला देशाबाहेर जायचा सल्ला दिला. तेव्हा मी विचारलं की कुठे जाऊ? मी इथेच राहतो, माझी आई आणि दोन मुलं आहेत. मला इथेच राहायचं आहे. अनेक प्रसंगांमधून मी गेलो आहे. मला एकटं वाटायचं अजूनही वाटतं. हे खरं आहे. जेव्हा तुम्ही कोणत्या चढ-उताराचा सामना करता तेव्हा आणखी जास्त एकटं वाटतं. एकटं राहून जेवण करणं हे सुद्धा तुम्हाला एकटेपणाची जाणीव करुन देतं. रब ने वो जोडी मेरे लिए नही बनाई."
करण जोहरचा आगामी 'तू मेरा मै तेरा, मै तेरा तू मेरी' सिनेमा रिलीज होणार आहे. कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांची सिनेमात जोडी आहे.