Join us  

आयकॉनिक सोफा, गिफ्ट हॅम्पर ते कॉफी मग; करण जोहरने शेअर केली 'कॉफी विथ करण सीझन 8' ची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 1:20 PM

‘कॉफी विथ करण सिझन 8’च्या सेटची एक झलक समोर आली आहे. 

सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता करण जोहर नेहमीच चर्चेत असतो. मग तो बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून झालेला वाद असो किंवा ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये कलाकारांनी केलेली वक्तव्य असो. आता पुन्हा एकदा करण जोहर चर्चेत आहे.  ‘कॉफी विथ करण सिझन 8’चा लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.  या शोच्या सेटची एक झलक समोर आली आहे. 

करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'कॉफी विथ करण सीझन 8' च्या सेटची झलक शेअर केली आहे. व्हिडीओमध्ये सेट उभारतानाची काही दृश्य आहेत. तर पांढऱ्या रंगाचा आयकॉनिक सोफा पाहायला मिळतो. शिवाय 'कॉफी विथ करण' असं नाव असलेला कपही दिसतोय. 'कॉफी विथ करण सीझन 8' चा सेट तयार झाला असून करण चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 

 शेवटचा सीझनही खूप मनोरंजक होता. जिथे सारा अली खान, जान्हवी कपूर, आलिया भट्ट, रणवीर सिंग, अक्षय कुमार, विजय देवरकोंडा, अनन्या पांडे आणि समंथा रुथ प्रभू यांच्यासह अनेक स्टार्स यामध्ये सहभागी झाले होते.  आता चाहत्यांच्या नजरा पुन्हा एकदा 'कॉफी विथ करण सीझन 8'च्या पाहुण्यांकडे खिळल्या आहेत.

प्रेक्षकांना पुन्हा एकदा करण जोहरच्या शोचा नवीन सीझन OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. यावेळी पुन्हा 'कॉफी विथ करण सीझन 8' Disney+ Hotstar वर प्रसारित होईल. प्रेक्षक २६ ऑक्टोबर २०२३ पासून या सीझनचे भाग पाहू शकतील.

टॅग्स :करण जोहरकॉफी विथ करण 6सेलिब्रिटीबॉलिवूड