Join us  

 करण जोहरच्या पार्टीत नशेत तर्र होते स्टार्स? व्हिडीओ पाहून युजर्सनी केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 10:56 AM

करणने या लेट नाईट पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर  शेअर केला आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सनी या सेलिब्रिटींना ट्रोल करणे सुरु केले.

ठळक मुद्देकरण जोहरने हा लेट नाईट पार्टीचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये सगळे स्टार्स एकत्र बसलेले  दिसत आहे.

करण जोहरला मित्रांसोबत पार्टी करणे आवडते. बॉलिवूडचे त्याचे अनेक मित्र सर्रास करणच्या घरी पार्टी करताना दिसतात. गत शनिवारी करणच्या घरी अशीच पार्टी रंगली. या लेट नाईट पार्टीत बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली. दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, वरूण धवन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, विकी कौशल, शाहिद कपूर असे सगळेजण या पार्टीत दिसले.  करणने या लेट नाईट पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर  शेअर केला आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सनी या सेलिब्रिटींना ट्रोल करणे सुरु केले. व्हिडीओत सर्व स्टार्स ज्या स्थितीत दिसत आहेत, त्यावरून ते सगळे नशेत तर्र असल्याचे युजर्सने म्हणणे आहे. 

व्हिडीओत अभिनेता विकी कौशलला पाहून तर त्याने ड्रग्ज घेतली असावी, अशी शक्यता युजर्सनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर विकी कौशलविरोधात युजर्सनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अनेकांनी विकी कौशलचा फोटो शेअर करून विकी दारूच्या नशेत आहे की ड्रग्जच्या असा प्रश्न उपस्थित केला आहे. कॅमेरा समोर येताच विकी आपले नाक स्वच्छ करताना दिसतो, यावरून अनेकांनी तो ड्रग्जच्या नशेत असल्याचा दावा केला आहे.

करण जोहरने हा लेट नाईट पार्टीचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये सगळे स्टार्स एकत्र बसलेले  दिसत आहे. सर्वप्रथम या व्हिडीओत दीपिका दिसते. अर्थात तिचा हबी रणवीर सिंग कुठेही दिसत नाही. पाठोपाठ दीपिकाचा एक्स बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरही या व्हिडीओत दिसतो. प् मलायका अरोरा मात्र तिचा बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबत दिसतो. वरूण धवन याची गर्लफ्रेन्ड नताशा दलाल ही सुद्धा या व्हिडीओ दिसते.  झोया अख्तर आणि अयान मुखजी हेही व्हिडीओत दिसतात. करण जोहरने हा व्हिडिओ शेअर करताना ‘सॅटरडे नाईट व्हाईब्स’ असे कॅप्शन दिले होता. हा सॅटरडे नाईटचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही तासांमध्येच हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे.  

मिलिंद देवरा यांनी केला खुलासा 

 

आता राजकीय पक्षांनीदेखील या पार्टीचा मुद्दा उचलून धरला आहे.  अकाली दलाचे नेते मजिंदर सिरसा यांनी करणच्या पार्टीतील व्हिडीओ शेअर करत, बॉलिवूड स्टार्सवर टीकास्त्र सोडले. ‘हे आहे फिक्शन वर्सेस रिअ‍ॅलिटी. पाहा बॉलिवूड कलाकार असे अभिमानाने अमली पदार्थांचे सेवन केल्याचे दाखवत आहेत. अशाप्रकारे अमली पदार्थांचे सेवन करणा-या कलाकारांचा मी विरोध करतो. तुमचाही याला विरोध असेल,तर रिट्विट करा’,असे ट्विट मंजिदर सिरसा यांनी केले. मात्र सिरसा यांच्या या ट्विटवर  काँग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा यांनी लगेच खुलासा केला. ‘माझी पत्नीदेखील त्या पार्टीमध्ये उपस्थित होती आणि या व्हिडीओमध्येदेखील ती दिसून येत आहे. या पार्टीमध्ये कोणत्याही कलाकाराने अमली पदार्थांचे सेवन केले नव्हते. त्यामुळे उगाच अफवा पसरवणे बंद करा. मी आशा करतो की याप्रकरणी तुम्ही माफी मागण्याचे धाडस कराल, असे उत्तर मिलिंद देवरा यांनी दिले.

टॅग्स :करण जोहरविकी कौशलदीपिका पादुकोण