Join us

नेपोटिझमचा डाग पुसणार करण जोहर? दोन नव्या चेहऱ्यांना लाँच करणार धर्मा प्रोडक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:59 IST

५०० जणांच्या ऑडिशनमधून या दोघांची निवड करण्यात आली आहे.

बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा मुद्दा अनेकदा चर्चेत असतो. या मुद्द्यावरुन करण जोहरला तर नेहमीच लक्ष्य केलं जातं. दरम्यान आता करण जोहर हा डाग पुसण्याच्या तयारित आहे. आपल्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत त्याने दोन नवीन चेहरे लाँच करण्याचं ठरवलं असल्याची अशी चर्चा आहे. धर्माने अद्याप याबाबात अधिकृत स्टेटमेंट जारी केलेलं नाही. मात्र करण आता स्टारकिड नव्हे तर नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारित आहे.

फिल्म अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करत लिहिले, "धर्मा प्रोडक्शन दोन नवीन चेहऱ्यांना लाँच करणार आहे. ५०० जणांच्या ऑडिशनमधून या दोघांची निवड करण्यात आली आहे. एक मुलगा आणि एक मुलगी यांना धर्माने टॅलेंट हंटमधून निवडलं आहे. दोघंही इंडस्ट्रीतीली बॅकग्राऊंडचे नाहीत. रॉ टॅलेंट आहे. दोघंही आऊटसाइडर आहेत. टॅलेंटवरुनच त्यांची निवड झाली आहे. फिल्म इंडस्ट्रीत नवीन टॅलेंटची मागणी वाढत आहे. अशात धर्मा प्रोडक्शन नवीन पिढीच्या ताऱ्यांना शोधून त्यांना लाँच करण्याकडे वाटचाल करत आहे."

हे दोन जण कोण आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र लवकरच या चेहऱ्यांवरुन पडदा उठणार आहे. कोण आहेत हे न्यूकमर? धर्माच्या कोणत्या सिनेमांमध्ये दिसणार? याबद्दल लवकरच माहिती समोर येणार आहे.

या पोस्टवर युजर्सने कमेंट केल्या आहेत. 'धर्मा प्रोडक्शन असली आऊटसाइडर्स ना लाँच करत आहे? वाह, बॉलिवूडचा मोठा प्लॉट ट्विस्ट','मला खात्री आहे की हे दोघं कपूर किंवा खान यांच्या दूरच्या नात्यातले असतील,'करणने नेपोकिड्सला लाँच केलं आणि फ्लॉप सिनेमे मिळाले. किल मध्ये लक्ष्य लालवानीला लाँच केलं आणि करोडो कमावले. आता करणला आणखी कमवायचं आहे म्हणूनच आउटसाइडर्सला घेत आहे' अशा कमेंट्स आल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Karan Johar to Launch Outsiders, Erasing Nepotism Tag?

Web Summary : Karan Johar's Dharma Productions plans to launch two new faces, moving away from nepotism. Selected from 500 auditions, these talents lack industry connections. Details about the newcomers and their projects are awaited.
टॅग्स :करण जोहरबॉलिवूड