Join us

कपूर खानदानची ‘भाईगँग’; हर्षवर्धनने शेअर केला भाऊ अर्जुन कपूर आणि वरूण धवनसोबतचा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 13:07 IST

सध्या सगळयांना वेध लागलेत ते सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्नाचे. सगळे कपूर कुटुंबीय हे आता वेगवेगळया विधींसाठी ...

सध्या सगळयांना वेध लागलेत ते सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्नाचे. सगळे कपूर कुटुंबीय हे आता वेगवेगळया विधींसाठी एकत्र आले आहेत. कपूर कुटुंबीय एकत्र आले म्हणजे धम्माल-मजा-मस्ती असणारच. नाही का? आता हेच बघा ना, सोशल मीडियावर अर्जुन कपूर, वरूण धवन आणि हर्षवर्धन कपूर यांचा एक सेल्फी व्हायरल होतो आहे. या फोटोला ‘बडे भैय्या’ असे कॅप्शन दिले असून या फोटोत हे तिघे फारच कूल दिसत आहेत. अर्जुन कपूरने या फोटोला कमेंट केली आहे की, ‘भावेश जोशी सुपरहिरो विथ बडे भैय्या अ‍ॅण्ड वरूण धवन.’ या फोटोला सोशल मीडियावर अनेक लाइक्स मिळत आहेत. सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूर त्याचा आगामी बॉलिवूड चित्रपट ‘भावेश जोशी सुपरहिरो’ मुळे चर्चेत आहे. हा हर्षवर्धनचा दुसरा चित्रपट असून या चित्रपटासाठी तो प्रचंड उत्सुक आहे. मात्र, मिर्झियाच्या रिलीजवेळी अभिनेता अर्जुन कपूर आपल्या चुलत भाऊ हर्षवर्धन कपूरच्या अभिनयाने चांगलाच प्रभावित झाला होता. ‘मिर्झिया’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगनंतर त्याने ट्विट करून हर्षवर्धनला कॉम्प्लिमेंट दिले आहे. आपल्या ट्विटर पोस्टमध्ये तो म्हणतो, हर्षवर्धन, ‘मला तुझा अभिमान वाटतो.’ या चित्रपटातून अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर व सैयमी खेर बॉलिवूडमध्ये पदार्पन करीत आहे. हा चित्रपट मिर्झा-साहिबान यांची लव्ह स्टोरी असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय वरूण धवन ‘सुई धागा’ आणि ‘कलंक’ या चित्रपटासाठी आणि अर्जुन कपूर हा ‘नमस्ते इंग्लंड’,‘संदीप और पिंकी फरार’, ‘पाणिपत’ या चित्रपटांसाठी चर्चेत आहेत.