Join us

kapil sharma showमध्ये आले ऋषी कपूर आणि नीतू सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 14:46 IST

बॉलिवूडमधले एव्हरग्रीन अभिनेते अर्थात ऋषी कपूर सध्या आपल्या ऑटोबायोग्राफीला घेऊन चर्चेत आहेत. त्यांची खुल्लम खुला ऋषी कपूर अनसेंसर्ड काही ...

बॉलिवूडमधले एव्हरग्रीन अभिनेते अर्थात ऋषी कपूर सध्या आपल्या ऑटोबायोग्राफीला घेऊन चर्चेत आहेत. त्यांची खुल्लम खुला ऋषी कपूर अनसेंसर्ड काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाली आहे. यात त्यांनी बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत. या ऑटोबायोग्राफीच्या प्रमोशनसाठी ते पत्नी नीतू सिंगह नुकतेच कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते.यावेळी कपिलच्या सेटवरच्या सर्व कलाकारांनी ऋषी कपूर यांच्यासोबत मिळून धमाल मस्ती केली. ऋषी कपूर यांना यावेळी एक सरप्राईज देण्यात आले. त्यांच्या नागिन या चित्रपटील काही सीन परफॉर्म करण्यात आले. कपिल शर्माच्या टीममधला किकू जेव्हा नागिन बनून ऋषी कपूर यांच्यासमोर आला त्यावेळी त्यांनी त्याच्यासमोर हात जोडले. या एपिसोडमध्ये गुलाटीचे गिटार वाजवण्याचे टैलेंट ही दिसले. तसेच या एपिसोडचे विशिष्ट म्हणजे यात बऱ्यादा दिवसांनी नवज्योत सिंग सिद्धू दिसले. सिद्धूचे कटआउट बऱ्याच दिवसांपासून सीटवर ठेवण्यात येत होते. सिद्धूच्या जागी शोमध्ये एवढे दिवस रवीना टंडन दिसत होती. या एपिसोड प्रेक्षकांना या आठवड्याच्या शेवटी टीव्हीवर दिसणार आहे. तर याच शोमध्ये नीतू सिंग यांनी आपला मुलगा रणबीर कपूरसाठी मुलगी पसंत केली आहे. हो तुम्ही बरोबर वाचता आहात. कॅटरिना बरोबर झालेल्या ब्रेकअपनंतर रणबीर कपूर एकटा आहे. इतर आईंप्रमाणे नितू सिंग यांना ही आपल्या मुलाच्या लग्नाची काळजी असणार म्हणून कपीलच्या शोमध्ये त्यांनी रणबीरसाठी मुलगी पसंत केली आहे. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे गुलाटी फोटोंमध्ये सुनील ग्रोवर वधूच्या पोशाखात नितू सिंग यांच्या पाय पडताना दिसतोय. ही सगळी धमाल मस्ती पहाण्यासाठी प्रेक्षकांना या आठड्याच्या शेवटाची वाट पहावी लागणार आहे.