Join us

ऋषभ शेट्टीचा 'कांतारा: चॅप्टर १' पाहून भारावला रितेश देशमुख, म्हणाला- "भविष्यातील पिढ्यांना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:09 IST

'कांतारा'च्या नंतर प्रेक्षकांना 'कांतारा: चॅप्टर १'बाबत उत्सुकता होती. 'कांतारा' प्रमाणेच 'कांतारा: चॅप्टर १'लाही प्रेक्षकांचं प्रेम मिळत असून त्याचं सर्वत्र कौतुकही होत आहे. अभिनेता रितेश देशमुखही 'कांतारा: चॅप्टर १' पाहून भारावून गेला आहे. 

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा: चॅप्टर १'ची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत होते. २०२२ साली प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' या सुपरहिट सिनेमाचा 'कांतारा: चॅप्टर १' हा प्रीक्वल आहे. 'कांतारा'च्या नंतर प्रेक्षकांना 'कांतारा: चॅप्टर १'बाबत उत्सुकता होती. 'कांतारा' प्रमाणेच 'कांतारा: चॅप्टर १'लाही प्रेक्षकांचं प्रेम मिळत असून त्याचं सर्वत्र कौतुकही होत आहे. अभिनेता रितेश देशमुखही 'कांतारा: चॅप्टर १' पाहून भारावून गेला आहे. 

'कांतारा: चॅप्टर १' सिनेमा पाहिल्यानंतर रितेशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिनेमातील कलाकारांचं कौतुक केलं आहे. "'कांतारा: चॅप्टर १' सिनेमा पाहणं म्हणजे एक थरारक आणि भव्य भारतीय सिनेमा पाहण्याच्या अनुभवासारखं होतं. ऋषभ शेट्टी तुम्ही जे काही करता ते अभुतपूर्व असतं... मग अभिनेता, लेखक किंवा दिग्दर्शक म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही काम करता ते त्यामुळे खरंच भविष्यातील पिढ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. उत्तम व्हिएफएक्स, अॅक्शन, उत्कृष्ट छायाचित्रण, थरारक पार्श्वसंगीत आणि सेट डिझाईन... मी या सिनेमात जे पाहिलं ते जादूसारखं होतं", असं त्याने म्हटलं आहे.  

पुढे रितेश म्हणतो, "रुक्मिणी वसंत तू खूपच प्रतिभावान अभिनेत्री आहे.  गुलशन देवैया, तुमची नकारात्मक भूमिका इतकी प्रभावी होती की ती पाहणंही थरारक वाटलं. अशा एका दर्जेदार आणि जबरदस्त सिनेमाबद्दल चित्रपटाच्या टीमचं मन:पूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा". दरम्यान 'कांतारा: चॅप्टर १' सिनेमा कन्नडसह हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शनही ऋषभ शेट्टीने केलं आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर 'कांतारा: चॅप्टर १' प्रदर्शित करण्यात आला. चारच दिवसांत या सिनेमात जगभरात ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ritesh Deshmukh overwhelmed by Rishab Shetty's 'Kantara: Chapter 1'.

Web Summary : Ritesh Deshmukh praised 'Kantara: Chapter 1', calling it a thrilling Indian cinematic experience. He lauded Rishab Shetty's acting, writing, and direction as inspirational for future generations. Deshmukh also commended the VFX, action, cinematography, and music, congratulating the team on the film's quality.
टॅग्स :कांतारारितेश देशमुख