Join us
Daily Top 2Weekly Top 5

-म्हणून ‘बेबी डॉल’ कनिका कपूरची दुस-यांदा केली टेस्ट, दुसरा कोरोना रिपोर्टही पॉझिटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 09:47 IST

याला म्हणतात, दूध का दूध और पानी का पानी

ठळक मुद्देकनिका कपूर ९ मार्चला लंडनहून भारतात आली होती.

बॉलिवूड बेबी डाल सिंगर कनिका कपूर हिची कोरोना  टेस्ट दुस-यांदा पॉझिटीव्ह आली आहे. होय, कनिकाच्या पहिल्या कोरोना चाचणीवर तिच्या कुटुंबीयांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने कनिकाची पुन्हा टेस्ट केली. यात कनिका पुन्हा पॉझिटीव्ह असल्याचे आढळले़ तूर्तास कनिकाची प्रकृती स्थिर असल्याचे कळतेय.

रविवारी कनिकाचे दुस-यांदा नमूने घेण्यात येऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या टेस्टचे रिपोर्ट आले असून यातही कनिकामध्ये  हायर लोड कोरोना व्हायरस आढळून आला आहे. कनिकाच्या पहिल्या कोरोना टेस्टच्या रिपोर्टवर तिच्या कुटुंबीयांनी काही आक्षेप नोंदवले होते. याचे कारण म्हणजे, या रिपोर्टमध्ये कनिकाचे वय आणि लिंग चुकीचे नमूद होते. रिपोर्टमध्ये कनिकाचे वय चक्क 28 वर्षे दाखवण्यात आले होते. प्रत्यक्षात तिचे वय 41 वर्षे आहे. याशिवाय स्त्रीच्या जागी पुरूष लिंग नमूद करण्यात आले होते. हे तपशील चुकीचे असल्याने कनिका व तिच्या कुटुंबीयांनी संबंधित रिपोर्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कनिकाची पुन्हा कोरोना टेस्ट करण्याची मागणीही केली जात होती. त्यानुसार, कनिकाची दुस-यांदा टेस्ट केली गेली. पण त्यातही ती पॉझिटीव्ह आढळली.

कनिका कपूर ९ मार्चला लंडनहून भारतात आली होती. रिपोर्टनुसार तिने विमानतळावर कोणतीही तपासणी केली नाही आणि यंत्रणेच्या डोळ्यात धूळ फेकून तिथून पसार झाली. यानंतर लखनऊला जाऊन ती कुटुंबियांना भेटली आणि अनेक पार्ट्या केल्या.  दरम्यान, ती ज्यांना भेटली होती त्या सा-यांची करोना चाचणी निगेटीव्ह  आली आहे. 

म्हणे कनिका खोटीदरम्यान संजय गांधी ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ  मेडिकल सायन्सचे डायरेक्टर जनरल आऱ के धीमान यांनी कनिका खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. हॉस्पीटलमधील रूम अस्वच्छ असल्याचा आणि तिथे डास असल्याचे कनिकाचे आरोप खोटे आहेत. तिला सर्वोत्तम सुविधा पुरवण्यात येत आहेत. रूग्णालयाचा स्टाफ चार तासांच्या शिफ्टमध्ये आहे. यादरम्यान स्टाफ ना काही खाऊ शकत ना काही पिऊ शकत. कारण त्यांनी संक्रमणरोधी पोशाख घातले आहेत, असे धीमान म्हणाले.

टॅग्स :कनिका कपूरकोरोना वायरस बातम्या