Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणौतचा रणबीर, रणवीर, विकीवर हल्लाबोल; म्हणाली, ड्रग्ज घेत नाही तर ब्लड टेस्ट करा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 15:01 IST

कंगना राणौतचे या चार बॉलिवूड स्टार्सला खुले आव्हान

ठळक मुद्दे  कोणत्याही फिल्मी कलाकाराला राष्ट्रीय पुरस्कार देण्यापूर्वी त्याची रक्तचाचणी बंधनकारक करा, अशी मागणी यापूर्वी कंगनाने केली होती. 

बॉलिवूड स्टार कंगना राणौतने आत्तापर्यंत बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा लावून धरला होता. पण आता ती बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनबद्दलही उघडपणे बोलताना दिसतेय. कंगनाने तिच्या नव्या ट्विटमध्ये बॉलिवूडच्या चार स्टार्सवर हल्लाबोल केला. अगदी या चारही स्टार्सची नावे घेत, कंगनाने त्यांना खुले आव्हान दिले. रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांना मी रक्ताची चाचणी करण्याची विनंती करते. तुम्ही कोकेन घेता, अशी अफवा आहे. या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी रणबीर, रणवीर, अयान व विकी यांना ब्लड टेस्ट करावी, असे मला वाटते. टेस्टमध्ये काहीही मिळाले नाही तर हे लोक कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणा ठरू शकतात, असे ट्विट कंगनाने केले आहे.

तूर्तास कंगनाने घेतलेल्या बोल्ड भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कंगनाच्या ट्विटवर कमेंट करताना अनेकांनी तिच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.

‘राष्ट्रीय पुरस्कार देण्याआधी टेस्ट करा’  कोणत्याही फिल्मी कलाकाराला राष्ट्रीय पुरस्कार देण्यापूर्वी त्याची रक्तचाचणी बंधनकारक करा, अशी मागणी यापूर्वी कंगनाने केली होती. बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्ज घेतले जाते. पाण्यासारखे ड्रग्ज वाहते, असे कंगना अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली होती. काही माझ्या वयाचे युवा  वैयक्तिकरित्या ड्रग्ज घेतात आणि शो करतात. या कलाकारांबद्दल ब्लाइंड आयटमदेखील लिहिले गेले होते. डीलर सारखे असतात. सर्व काही एक प्रकारे हाताळले जाते. त्यांच्या पत्नीदेखील अशा पार्टी आयोजित करतात़ तिथे पूर्णपणे वेगळे वातावरण असते. तिथे असे लोक भेटतात जे फक्त ड्रग्स घेतात आणि दुस-यांसोबत दुर्व्यवहार करतात. काही सरकारांनी या बॉलिवूडच्या ड्रग्ज माफियांना पुढे जाण्यासाठी सहकार्य केले. बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांमध्ये रिलेशन आहे. ते एकमेकांना ओळखतात. बॉलिवूडचे अनेक कलाकार बालपणापासून ड्रग्जच्या आहारी गेलेले आहेत. अशाच एका अभिनेत्याला मी डेटही केले आहे, असेही ती म्हणाली होती.

टॅग्स :कंगना राणौतरणवीर सिंगरणबीर कपूर