Join us

तापसी पन्नूने घेतली कंगना राणौतची ‘शाळा’; म्हणे, ‘हिने लावला माझा निकाल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 17:52 IST

आता मात्र तिने तापसी पन्नूकडे मोर्चा वळवला असून तापसीवरही तिने अनेक आरोप केलेत. यावर तापसी कशी शांत बसेल? तिनेही कंगनाची चांगलीच ‘शाळा’ घेतल्याचे समजतेय.

सध्या बॉलिवूडमध्ये नेपोटिजममुळे रान माजले आहे. सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील काही कलाकारांनी नेपोटिजमच्या मुद्याला उचलून धरले आहे. बॉलिवूड माफियांनी सुशांतचे करिअर संपवले असे कंगना राणौतचे म्हणणे आहे. करण जोहर आणि इतर दिग्दर्शकांमुळे सुशांतने जीव दिला, असे कंगनाचे म्हणणे आहे. आता मात्र तिने तापसी पन्नूकडे मोर्चा वळवला असून तापसीवरही तिने अनेक आरोप केलेत. यावर तापसी कशी शांत बसेल? तिनेही कंगनाची चांगलीच ‘शाळा’ घेतल्याचे समजतेय. ती कंगनाला काय म्हणाली हे वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल, तर मग वाचा...

त्याचं झालं असं की, अलीकडेच एका इंटरव्ह्यूदरम्यान कंगना राणौतने तापसी पन्नूबद्दल वक्तव्य केलं. तिने तापसी पन्नूला बी-ग्रेड अभिनेत्री म्हणून संबोधले. तिने सांगितले,‘तापसीसारखे लोक तर म्हणतील की, त्यांना नेपोटिजममुळे काही फरक पडत नाही. तिला करण जोहर खुप पसंत आहे. परंतु, अशी बी ग्रेड अभिनेत्री जी दिसायला ठीक आहे, तिला काम का मिळत नाही? तुझं असणंच नेपोटिजमचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. आता कंगनाचे हे वक्तव्य क्षणार्धात व्हायरल झाले आहे. मात्र, तापसीने तिची चांगलीच खिल्ली उडवल्याचे समजतेय.

तापसी पन्नू काही या वक्तव्यावर शांत बसणारी नाही. तिनेही टिवटरवर निनावी एक टिवट केले. तिने टिवट केले की,‘मला कळालं की, आता दहावी आणि बारावीनंतर आमचाही निकाल जाहीर झालाय...आता आपला ग्रेड सिस्टीम ऑफिशिअल झाले आहे. परंतु, आत्तापर्यंत तर नंबर सिस्टीमवर व्हॅल्यू ठरवल्या जात होती ना?’ तापसीच्या या खरमरीत उत्तरावर कंगनाने अजून तरी काही टिवट केलेले नाही. मात्र, नेटिझन्स तापसीला ट्रोल केल्याशिवाय शांत बसत नाहीयेत. त्यांच्या म्हणण्यानुसार कंगनाचे वक्तव्य हे एकदम परफेक्ट आहे. बघूयात आता या दोघींमधील कोल्ड वॉरला कसे वळण मिळतेय ते...