ALSO READ: इंटरनेटवर व्हायरल झाला कंगना राणौतचा शाही अंदाज, राणी लक्ष्मीबाईंच्या लूकमध्ये दिसली कंगना
आता कंगना व दीपिकाचा काय संबंध, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण संबंध आहे. किमान कंगनाला तरी तसे वाटतेय. होय, दीपिकाचा ‘पद्मावती’मधील लूक आणि तिचे नुकतेच रिलीज झालेले ‘घूमर’ हे गाणे सोशल मीडियावर तुफान गाजतेय. दीपिकाच्या राणी पद्मावतीच्या लूकची जोरदार प्रशंसा होते आहे आणि दीपिकाच्या याच प्रशंसेमुळे कंगनाला म्हणे असुरक्षित वाटू लागले आहे. (कंगना व दीपिका दोघीही ऐतिहासिक पात्र पडद्यावर जिवंत करणार आहेत. कंगना राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारते आहे तर दीपिका राणी पद्मावतीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.) याच असुरक्षितेतून कंगनाचा राणी लक्ष्मीबाई लूक जाणीवपूर्वक लीक केला गेल्याचे कळतेय. सूत्रांचे मानाल तर, ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’च्या सेटवरचे कंगनाचे फोटो लीक होणे हा योगायोग नव्हताच. तर हा योगायोग घडवून आणला गेला होता. कदाचित ‘हम भी कुछ कम नहीं,’ असे कंगनाला सिद्ध करायचे असेल. पण हे असे सिद्ध करणे कंगनालाच भारी पडू नये, म्हणजे मिळवले. कारण ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ रिलीज व्हायला सध्या बराच काळ आहे. असे असताना असुरक्षिततेतून निर्माण झालेली ही घाई कंगनावरच बूमरँग होऊ शकते.