Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना रणौतचा 'भारत भाग्य विधाता' चित्रपट कधी प्रदर्शित होणार, तारीख आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 15:38 IST

कंगना रणौत पुन्हा एकदा एका दमदार विषयावर आधारित चित्रपट घेऊन येत आहे.

Bharat Bhagya Vidhata : बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणौत पुन्हा एकदा एका दमदार विषयावर आधारित चित्रपट घेऊन येत आहे. कंगनाच्या आगामी 'भारत भाग्य विधाता' या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठी अभिनेत्रींची फौज असणार आहे. 

कंगनाने स्वतः इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केलं. पोस्टर शेअर करताना कंगनाने लिहिलं, "आपण अनेकदा मोठ्या आणि नाट्यमय शौर्यकथांचा गौरव करतो, पण खरं धैर्य शांतपणे आपलं कर्तव्य निभावत असतं. 'भारत भाग्य विधाता' ही साहस, बलिदान, मानवता आणि ऐक्याची कथा आहे". तिने पुढे लिहिलं, "ही खरी देशभक्ती आहे, जिथे कर्तव्य कृतीत उतरते. शहराला कठीण काळात सावरणाऱ्या लोकांना ही कथा आदरांजली आहे. प्रेक्षकांनी १२ जून रोजी ही कथा मोठ्या पडद्यावर अनुभवावी, यासाठी मी उत्सुक आहे".


मराठी कलाकारांची फौज
जयंतीलाल गडा (पेन स्टुडिओ), मणिकर्णिका फिल्म्स आणि परमहंस क्रिएशन्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात कंगनासोबत मराठमोळी गिरिजा ओक, स्मिता तांबे, अमृता नामदेव, ईशा डे, प्रिया बेर्डे, आशा शेलार, सुहिता थत्ते आणि रसिका आघासे यांसारख्या प्रतिभावान अभिनेत्रींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kangana Ranaut's 'Bharat Bhagya Vidhata' release date announced: June 12, 2026

Web Summary : Kangana Ranaut's 'Bharat Bhagya Vidhata,' celebrating courage and duty, releases June 12, 2026. The film features notable Marathi actresses, showcasing unity and sacrifice in a city's challenging times.
टॅग्स :कंगना राणौत