Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणौतने भावंडांना भेट दिले चार फ्लॅट, किंमत वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 17:21 IST

कंगनाने नुकतेच इतके कोटी खर्च करून चौघा भावंडांना चंदीगढमध्ये अलिशान फ्लॅट भेट म्हणून दिले आहेत.

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत विविध कारणांमुळे चर्चेत येत असते. आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. कंगनाने नुकतेच चार कोटी खर्च करून चौघा भावंडांना चंदीगढमध्ये अलिशान फ्लॅट भेट म्हणून दिले आहेत. बहीण रंगोली चंडेल, भाऊ अक्षत आणि अन्य दोन चुलत भावडांना तिने चार फ्लॅट भेट म्हणून दिले आहेत.

कंगना राणौत तिच्या भावंडांच्या पाठीशी नेहमीच उभी असते आणि त्यांना पाठबळ देते असे तिच्या जवळच्या नातेवाईकांचे मत आहे. तिने चौघांना भेट म्हणून दिलेले फ्लॅट हे चंदीगढ विमानतळाजवळील उच्चभ्रूंच्या सोसायटीमध्ये आहेत. हा परिसर मोठे मॉल आणि रेस्टॉरंटससाठी ओळखला जातो आणि कायम गजबजलेला असतो. नातेवाईकांच्या मते हिमाचल प्रदेशातील प्रत्येक व्यक्तीला आपले घर चंदीगढमध्ये असावे असे वाटत असते. त्यामुळेच कंगनाने तिच्या भावंडांचे हे स्वप्न पूर्ण केले आहे.

हॉलिवूडमधील अभिनेता जॉर्ज कुलनीने अशीच त्याच्या १४ भावंडांना प्रत्येकी दहा लाख डॉलर भेट म्हणून एकदा दिले होते. कंगनाने त्याच्या पावलावर पाऊल ठेवत तिच्या चौघा भावंडाना अलिशान फ्लॅट भेट दिल्याचे म्हटले जात आहे.

कंगनाने २०१७मध्ये तिच्या गुरूंना दक्षिणा म्हणून दोन कोटी रुपये किंमतीचा फ्लॅट दिलेला आहे. तिचे योगगुरु सूर्य नारायणसिंग यांना तिने अंधेरी (पश्चिम) येथील टू बीएचके फ्लॅट दिला होता. तिने त्यांच्याकडून योगाचे धडे घेतले आहेत.

कंगना राणौतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती थलाइवी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जयललिता यांची भूमिका करताना दिसणार आहे. यासोबतच ती तेजस, धाकड आणि मणिकर्णिका रिटर्न्समध्येही झळकणार आहे.

टॅग्स :कंगना राणौत