Join us  

लाल किल्ल्यावर रावण दहनावेळी नेम चुकल्यानं कंगना रणौत ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 2:23 PM

कंगनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून एका चुकीमुळे तिला ट्रोल केलं जातंय.

अभिनेत्री कंगना रणौत आणि ट्रोलर्सचं जुन नातं आहे. कंगनाला सोशल मीडियावर कायमच वेगवेगळ्या कारणांसाठी ट्रोल केलं जातं. तर अनेकदा या ट्रोल करणाऱ्यांना ती सडेतोड उत्तरही देत असते. नुकतच कंगनाने दिल्लीतील प्रसिद्ध लवकुश रामलीलामध्ये रावण दहन केलं. या कार्यक्रमामधील कंगनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून एका चुकीमुळे तिला ट्रोल केलं जातंय.

दिल्लीच्या प्रसिद्ध रामलीला मैदानावरील रावण दहनाचा कार्यक्रम बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतच्या हस्ते पार पडला. यावेळी कंगनाने केशरी रंगाची ब्रोकेड बनारसी साडी परिधान करुन केसात लाल रंगाचा गजराही लावला होता. ५० वर्षांच्या इतिहासात एका महिलेकडून बाण मारून रावणाचा पुतळा जाळण्याची ही पहिलीच वेळ होती.  लवकुश रामलीलामध्ये रावणाचे दहन करण्यासाठी कंगनाने धनुष्यबाणातून बाण सोडला पण तिचा नेम चुकला. असे एक दोनदा घडले. याचा घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि अनेक नेटकरी कंगनाला ट्रोल करत आहेत.  

एका नेटकऱ्यानं कंगनाचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मी प्रथमच शुपर्णखाला रावणाचा वध करताना पाहत आहे. तर एकाने लिहलं की, "रिल लाईफ कंगना वर्सेस रिअल लाईफ कंगना, बाण चले ना चले पर नवाबी न घटे'. तर आणखी एका युझरनं म्हटलं, 'जुबान चलाने से, तीर चलाना कितना आसान है'.  एका नेटकऱ्यानं लिहलं,  'जर रील लाइफमध्ये ही गोष्ट घडली असती तर कंगना दीदीने तिच्या बाणाने हिमालय तोडला असता'.

कंगना राणौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिचा तेजस हा चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सर्वेश मेवाडा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून रॉनी स्क्रूवाला यांच्या प्रॉडक्शन हाऊसने याची निर्मिती केली आहे. 'तेजस'मध्ये अभिनेत्री कंगना राणौतसोबत अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशिष विद्यार्थी आणि विशाक नायर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय कंगना 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार आहे.

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडसेलिब्रिटी