Join us  

सुशांतला मारलं आणि करण जोहर मुलांची पब्लिसिटी करतोय, कंगनाने साधला निशाणा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 10:45 AM

कंगना रनौतने करणला या पुस्तकावरूनही सुनावलं आहे. तिने सुशांत केसचा उल्लेख करत करणच्या या पुस्तकाची खिल्ली उडवली आहे.

दिग्दर्शक करण जोहरने सोशल मीडियावर काहीही शेअर केलं तरी त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. नुकतीच करणने सोशल मीडियावर एका पुस्तक लॉन्च करणार असल्याची पोस्ट शेअर केली. या पुस्तकाबाबत त्याने सांगितले की, हे पुस्तक पॅरेंटींगबाबत असेल. आणि कथा त्याच्या मुलांच्या अवतीभवती फिरेल. पण करणला या पुस्तकासाठी काही खास प्रतिसाद मिळाला नाही. लोकांनी त्याला पुन्हा ट्रोल करणे सुरू केले. कंगना रनौतला पुन्हा एकदा करणवर भडण्याची संधीही मिळाली.

कंगना रनौतने करणला या पुस्तकावरूनही सुनावलं आहे. तिने सुशांत केसचा उल्लेख करत करणच्या या पुस्तकाची खिल्ली उडवली आहे. तिने ट्विटमध्ये लिहिले की, करण जोहर, आदित्य चोप्रा, महेश भट्ट यांच्या सारख्या मुव्ही माफियामुळे सुशांतला मारला गेला. एका परिवाराच्या मुलाचं शोषण केलं गेलं. पण इथे करण जोहर आपल्या मुलांना प्रमोट करत आहे. शरमेची बाब आहे'.

करण जोहरला ट्रोल करणारं कंगनाचं हे ट्विट व्हायरल झालंय आणि करणबाबतचा लोकांमधील रोष अधिक उफाळून आलाय. कंगनाने याआधीही करणवर गंभीर आरोप लावत पीएमओकडे मागणी केली होती की, त्याला अटक झाली पाहिजे. तिने करणला मुव्ही माफियाचा मुख्य आरोपी म्हटलं होतं. इतकेच नाही तर करणवर तिने कलाकारांचं करिअर संपवण्याचा आरोपही लावला होता. 

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपासून करण जोहर हा सर्वांच्या निशाण्यावर आलाय. कंगनाने नेहमीच त्याला ट्रोल केलंय. सोबतच बॉलिवूडमधील नेपोटिज्मचा वादही पेटला आहे.

हे पण वाचा :

तापसी पन्नूनंतर विद्या बालनने केला रियाला सपोर्ट, म्हणाली - जे होतंय त्याचं वाईट वाटतंय!

मला अनफॉलो का केलं जातय? फॉलोअर्स कमी होत असल्याने कंगना झाली अस्वस्थ

कंगना रनौतने सांगितली तिच्या टॅटूची कहाणी, म्हणाली - आता टॅटूला फायनल लूक मिळालाय!

टॅग्स :कंगना राणौतकरण जोहरबॉलिवूडसुशांत सिंग रजपूत