तापसी पन्नूनंतर विद्या बालनने केला रियाला सपोर्ट, म्हणाली - जे होतंय त्याचं वाईट वाटतंय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 10:07 AM2020-09-02T10:07:59+5:302020-09-02T10:09:35+5:30

अभिनेत्री लक्ष्मी मान्चूने रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये ट्विट करत मीडिया ट्रायलवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यासोबत लक्ष्मी मान्चूने सोशल मीडियावर रिया आणि तिच्या परिवाराची होत असलेल्या लिचिंगबाबतही उल्लेख केलाय.

Vidya Balan supports Rhea Chakraborty after Taapsee Pannu | तापसी पन्नूनंतर विद्या बालनने केला रियाला सपोर्ट, म्हणाली - जे होतंय त्याचं वाईट वाटतंय!

तापसी पन्नूनंतर विद्या बालनने केला रियाला सपोर्ट, म्हणाली - जे होतंय त्याचं वाईट वाटतंय!

googlenewsNext

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीची चौकशी करत आहे. दरम्यान कथित मीडिया ट्रायलबाबत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी रियाच्या सपोर्टमध्ये समोर आले आहेत. तापसी पन्नू, मिनिषा लांबा, लक्ष्मी मान्चूनंतर आता अभिनेत्री विद्या बालन रियाच्या सपोर्टमध्ये समोर आली आहे.

अभिनेत्री लक्ष्मी मान्चूने रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये ट्विट करत मीडिया ट्रायलवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यासोबत लक्ष्मी मान्चूने सोशल मीडियावर रिया आणि तिच्या परिवाराची होत असलेल्या लिचिंगबाबतही उल्लेख केलाय. आता विद्याने हेच ट्विट रिट्विट करत आपलं मत व्यक्त केलंय.

काय म्हणाली विद्या?

विद्याने लिहिले की, 'देव तुझी रक्षा करो लक्ष्मी मान्चू, तुम्ही हा मुद्दा उचलला. हे फारच दुर्भाग्यपूर्ण आहे की, आपला प्रिय आणि तरूण स्टार सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आता मीडिया सर्कस बनली आहे. एका महिला म्हणून रिया चक्रवर्तीबाबत होत असलेल्या विचित्र चर्चांनी माझं मन दु:खी होतं. ती दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष नाहीये का? की ती दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष आहे? चला एका नागरिकाच्या संविधानीक अधिकारांसाठा काही सन्मान दाखवू आणि कायद्याला आपलं काम करू देऊ'.

तापसीनेही केलं होतं ट्विट

तापसी पन्नूने देखील लक्ष्मी मान्चूचं ट्विट रिट्विट करत लिहिले होते की 'मी सुशांतला पर्सनली ओखळत नाही आणि ना रियाला ओळखते. पण मला हे माहीत आहे की, एका माणूस या नात्याने दोषी ठरण्याआधीच कुणाला दोषी ठरवणं योग्य नाही. कायद्यावर विश्वा ठेवा. आपल्या पवित्रतेसाठी आणि मृताच्या पवित्रतेसाठी का होईना'.

सीबीआयकडून खुलासा

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये सीबीआयचा तपास गेल्या ११ दिवसांपासून सुरू आहे. आतापर्यंत मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीसह नीरज, सिद्धार्थ पिठानी, केशव, सॅम्युअल मिरांडा आणि इतरही लोकांची चौकशी करण्यात आली. मंगळवारी रियाच्या आई-वडिलांची आणि सुशांतची एक्स मॅनेजर श्रुति मोदी यांचीही चौकशी झाली. पण अजूनही सीबीआयला असे कोणतेच पुरावे मिळाले नाहीत, जे हत्येकडे इशारा करतील.

हत्येशिवाय सीबीआय सुशांत सिंह राजपूत केसमध्ये दोन मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करत होती. सीबीआय आता आत्महत्येसाठी भाग पाडणे या दृष्टीने केसचा तपास पुढे नेत होती. पण आता सीबीआयची अडचण ही आहे की, वेगवेगळ्या अ‍ॅंगलने प्रश्न विचारूनही सुशांत केसचं गुपित काही उलगडलं जात नाहीये.

सीबीआयने सांगितले हत्येचे पुरावे नाहीत

आजतकच्या एका रिपोर्टनुसार, सीबीआयच्या तीन अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता सुशांतच्या केसमध्ये हत्येचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. पण तपास वेगवेगळ्या शक्यतांचा तपास सुरू आहे. सीबीआयच्या हाती अजूनही असे काहीच ठोस पुरावे लागले नाहीत. ज्यांच्या आधारावर अटक करता येईल.

'आत्महत्येला भाग पाडण्याचेही पुरावे नाहीत'

सीबीआय अधिकाऱ्यांनी एका न्यूज चॅनलला सांगितले की, ११व्या दिवसाच्या चौकशीनंतर आता ते आत्महत्येच्या अ‍ॅंगलवर फोकस करत आहेत. कारण यात आत्महत्येला भाग पाडण्याची केस तयार होत नाहीये. सीबीआय टीमने  क्राइम सीन दोनदा रिक्रिएट केलाय. पण तिथेही काहीच हाती लागलं नाही. 

हे पण वाचा :

sushant death case : रिया चक्रवर्ती, तिच्या भावाला केव्हाही होऊ शकते अटक, ड्रग पेडलरशी थेट संबंध असल्याचे उघड

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात हत्येचा पुरावा नाही, तपास सुरू आहे; सीबीआय अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण माहिती

रिया चक्रवर्तीने का केले सुशांतची बहीण प्रियंकाला टार्गेट?, गणेशने केला धक्कादायक खुलासा

Web Title: Vidya Balan supports Rhea Chakraborty after Taapsee Pannu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.