Join us  

Bollywood vs South Cinema: ‘ हे तर तो खरं बोलला...’, कंगनाचा महेश बाबूला ‘फुल्ल सपोर्ट’; वाचा काय म्हणाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 10:16 AM

Bollywood vs South Cinema: होय, कंगनाने महेश बाबूचं जोरदार समर्थन केलं आहे. महेश बाबू जे काही बोलला ते अगदी खरं आहे. बॉलिवूड खरंच त्याला अफोर्ड करू शकत नाही, असं कंगना म्हणाली.

Kangana Ranaut on Mahesh Babu bollywood controversy:  बॉलिवूड मुझे अफोर्ड नहीं कर सकता, असं साऊथ स्टार महेश बाबू (Mahesh Babu) बोलला आणि वातावरण तापलं. बॉलिवूड विरूद्ध साऊथ सिनेमाचा वाद उफाळून आला. तूर्तास दोन्ही बाजूंचे स्टार्स या वादात उतरले आहेत. बॉलिवूड स्टार्सही यावर प्रतिक्रिया देत आहेत.  अनेक बॉलिवूड स्टार्सनी या वादावर प्रतिक्रिया देत महेश बाबूला फटकारलं आहे. आता आपल्या परखड विधानांमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौत  (Kangana Ranaut) या वादावर बोलली आहे. होय, कंगनाने महेश बाबूचं जोरदार समर्थन केलं आहे. महेश बाबू जे काही बोलला ते अगदी खरं आहे. बॉलिवूड खरंच त्याला अफोर्ड करू शकत नाही, असं कंगना म्हणाली.

‘धाकड’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये ती बोलली. यावेळी तिला महेशबाबूच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला आणि तिने महेश बाबूला पाठींबा दिला. ‘महेश बाबू खरं बोलला. बॉलिवूड त्याला अफोर्ड करू शकत नाही, हे खरं आहे. कारण मला हे माहित आहे. बॉलिवूडच्या अनेक निर्मात्यांनी महेश बाबूला चित्रपट आॅफर केलेत आणि त्याच्या जनरेशनने आपल्या जोरावर तेलगू फिल्म इंडस्ट्रीला भारताची नंबर 1 इंडस्ट्री बनवलं आहे. त्यामुळे आता निश्चितपणे बॉलिवूड त्यांना अफोर्ड करू शकत नाही,’ असं ती म्हणाली.

पुढे ती म्हणाली, अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद का निर्माण व्हावेत? आपण पण नेहमी म्हणतो की हॉलिवूड आम्हाला अफोर्ड करू शकत नाही. कदाचित वेगवेगळ्या संदर्भानं वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. अर्थात हे खरं आहे की, महेश बाबू जे काही बोलला त्यातून त्याचा त्याच्या इंडस्ट्रीबद्दलचा आदर दिसतो. तेलगू इंडस्ट्रीला सगळं काही आयतं मिळालेलं नाही. गेल्या 10-15 वर्षांपासून ते अथक परिश्रम घेत आहेत. त्यांनी तामिळ इंडस्ट्रीलाही मागे सोडलं आहे. आपण फक्त त्यांच्याकडून शिकू शकतो.’

टॅग्स :कंगना राणौतमहेश बाबूबॉलिवूड