Join us

Kangana Ranaut : कंगनाचा ड्रेस पाहून  प्रिन्सिपल मॅमनी केली होती भविष्यवाणी.., ‘क्वीन’चा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 15:16 IST

Kangana Ranaut Shares Throwback Pictures : कॉलेज होस्टेलमधला कंगना चा पहिला दिवस होता.  प्रिन्सिपल मॅम मिस सचदेवा यांनी कंगनाचा ड्रेस पाहून तिला नोटीस केलं.  तिला जवळ बोलावलं...

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत रोज या ना त्या कारणानं चर्चेत असते. सिनेमांपेक्षा तिच्या वक्तव्यांचीच चर्चा होते.  सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असलेल्या कंगनाने आता काही जुने फोटो शेअर केले आहेत.  या फोटोमागचा किस्साही तिने सांगितला आहे. कंगनाच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलने केलेल्या एका भविष्यवाणीबद्दल देखील तिने सांगितलं. एक फोटो कंगनाच्या बालपणीचा आहे. यात ती शेतात बसलेली दिसतेय. एक हॉस्टेलच्या पहिल्या दिवशीचा फोटोही तिने शेअर केला आहे. सोबत एक भावुक किस्सा आहेच.

तर किस्सा आहे कंगनाच्या प्रिन्सिपल मॅम मिस सचदेवा यांचा. चंदीगडच्या कॉलेज होस्टेलमधला तिचा पहिला दिवस होता.  प्रिन्सिपल मॅम मिस सचदेवा यांनी कंगनाचा ड्रेस पाहून तिला नोटीस केलं.  तिला जवळ बोलावलं.  ,'तु कुठून आली आहेस?' असं त्यांनी कंगनाला विचारलं. यावर मी हिमाचल प्रदेशमधून आलीये, असं अगदी लाजत घाबरत कंगनाने सांगितलं. 'तु हा ड्रेस कुठून घेतलास?'' असा लगेच दुसरा प्रश्न त्यांनी केला. यावर, मी हा ड्रेस स्वत: डिझाईन केलाये आणि नंतर गावातील ट्रेलरकडून शिवून घेतला, असं उत्तर कंगनाने दिलं. कंगनाचं हे उत्तर ऐकून प्रिन्सिपल मॅम गोड हसल्या. त्यांनी तिला मिठी मारत, एक भविष्यवाणी केली. एक दिवस तू सिनेमात मोठी स्टार होशील..., असं त्या म्हणाल्या. प्रिन्सिपल मॅमची ही भविष्यवाणी अगदी खरी ठरली.

कंगना म्हणाली...मी बॉलिवूड इंडस्ट्रीत मी आले तेव्हा माझ्या प्रिन्सिपल मॅडमनी माझा कॉलेजतर्फे सम्मान केला. मला आठवतंय त्याक्षणी तिथं खूप लोक उपस्थित होते आणि सगळेच माझ्यासाठी खूश होते. पण सर्वाधिक अभिमान माझ्या प्रिन्सिपल मॅडमच्या चेहऱ्यावर होता. जेव्हा कधी प्रिन्सिपल मॅडम मला भेटायला मुबंईला यायच्या तेव्हा नेहमी माझ्या कपाळावर किस करत मला आशीर्वाद द्यायच्या. तो माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद असायचा..., असंही कंगनाने सांगितलं.

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूड