Join us  

मुंबईतील ही गोष्ट मिस करतेय कंगना राणौत, शेअर केली पोस्ट

By रूपाली मुधोळकर | Published: November 02, 2020 1:38 PM

मुंबईच्या आठवणीने कंगना व्याकुळ...

ठळक मुद्देअभिनेत्री कंगना राणौत सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव आहे. असा एकही मुद्दा नाही, ज्यावर ती बोलत नाही.

अभिनेत्री कंगना राणौत सध्या मनालीस्थित आपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतेय. पण कर्मभूमी मुंबईच्या आठवणीने कदाचित कंगना व्याकुळ झालीये. मुंबईतील एक गोष्ट ती सतत मिस करतेय. एक पोस्ट शेअर करत कंगनाने स्वत: याबद्दल माहिती दिली.‘मुंबईतील एक गोष्ट मी खूप मिस करतेय. ती म्हणजे रेस कोर्सवर प्रत्येक दुस-या सकाळी घोडेस्वारी करणे. मी कधीही स्पोर्ट पर्सन नव्हते. पण मला घोडेस्वारी करणे मनापासून आवडते,’ असे कंगनाने या पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबत काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती घोडेस्वारी करताना दिसतेय.

ध्रुव राठीवर बरसली कंगनाअभिनेत्री कंगना राणौत सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव आहे. असा एकही मुद्दा नाही, ज्यावर ती बोलत नाही. आता कंगनाने प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीच्या त्या व्हिडीओवर रिअ‍ॅक्शन दिली आहे ज्यात त्याने बीएमसीकडून कंगनाचे आॅफिस तोडण्याबाबत चर्चा केली. त्याने पैसे घेऊन व्हिडीओ तयार केला आहे, असा आरोप कंगनाने ध्रुव राठीवर केला आहे. 

एका जर्नलिस्ट फिल्ममेकरने एक ट्विट केले होते. ‘  एका प्रसिद्ध यूट्यूबरने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणावर त्यांचा परिवाराची भूमिका आणि कंगनाला टार्गेट करणारे व्हिडीओ बनवण्यासाठी ६५ लाख रुपए घेतले आहे,’ असे या जर्नलिस्ट फिल्ममेकरने धु्रव राठीचे नाव न घेता म्हटले होते. कंगनाने या ट्विटवर रिअ‍ॅक्ट करत, धु्रव राठीला लक्ष्य केले. ‘या व्यक्तीला व्हिडीओ बनवण्यासाठी पैसे मिळतात. माझ्या घराबाबत मिळालेल्या बीएमसी नोटीसबाबत व्हिडीओत खोटं बोलण्यासाठी ती त्याला (राठी) तुरूंगात पाठवू शकते. यासाठी त्याला ६० लाख रुपए मिळाले होते.  सरकारचा पाठिंबा आणि पैसा मिळाल्याशिवाय एखादी व्यक्ती कायद्याच्या प्रक्रियेवर अशाप्रकारे खुलेआम खोटं का बोलेल,’असे ट्विट  कंगनाने केले आहे.  रिपोर्टनुसार, ध्रुव राठीने त्याच्या एका जुन्या व्हिडीओत कंगनाबद्दल एक दावा केला होता. कंगनाला बेकायदेशीर बांधकामासाठी बीएमसीने २०१८ मध्ये नोटीस पाठवली होती, असा दावा त्याने केला होता.

संजय राऊत पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर; म्हणाली, ...येथून पैसा कमावणाऱ्यांना हरामखोर म्हटलं जाणार नाही

जस्टिन ट्रूडो उत्तर द्या...! आता कंगना राणौत थेट कॅनडाच्या पंतप्रधानांवर बरसली

टॅग्स :कंगना राणौत