संजय राऊत पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर; म्हणाली, ...येथून पैसा कमावणाऱ्यांना हरामखोर म्हटलं जाणार नाही

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 1, 2020 01:00 PM2020-11-01T13:00:10+5:302020-11-01T13:04:13+5:30

कंगना रणौतने पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. कंगनाने आपल्या एका ट्विटमध्ये हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या 'भूत पुलिस' या चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित न्यूज आर्टिकल शेअर करत लिहिले आहे...

kangana ranaut on shiv sena leader sanjay raut says no one be called haramkhor who makes money from himachal pradesh | संजय राऊत पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर; म्हणाली, ...येथून पैसा कमावणाऱ्यांना हरामखोर म्हटलं जाणार नाही

संजय राऊत पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर; म्हणाली, ...येथून पैसा कमावणाऱ्यांना हरामखोर म्हटलं जाणार नाही

Next
ठळक मुद्देकंगना रणौतने पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.देव भूमी प्रत्येक भारतीयाची आहे आणि कुणी या राज्यातून पैसे कमवत असेल, तर त्याला 'हरामखोर' अथवा 'नमकहराम' म्हटले जाणार नाही - कंगनाकंगनाच्या ट्विटवरून भडकलेल्या संजय राऊतांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाला हरामखोर मुलगी, असे म्हटले होते.

नवी दिल्ली - कंगना रणौतने पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. कंगनाने आपल्या एका ट्विटमध्ये हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या 'भूत पुलिस' या चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित न्यूज आर्टिकल शेअर करत लिहिले आहे, "सध्या हिमाचल मुंबईच्या अनेक फिल्म यूनिट्सचे होस्टिंग करत आहे. देव भूमी प्रत्येक भारतीयाची आहे आणि कुणी या राज्यातून पैसे कमवत असेल, तर त्याला 'हरामखोर' अथवा 'नमकहराम' म्हटले जाणार नाही. जर, असे कुणी म्हणत असेल तर, मी त्याची निंदा करते, बॉलीवुड प्रमाणे गप्प बसणार नाही."

राऊत कंगनाला म्हणाले होते हरामखोर -
कंगना रणौत ने गेल्या महिन्यात सुशांत सिंह राजपूत केसवरून मुंबई पोलिसांवर टीका केली होती. एवढेच नाही, तर तिने संजय राऊतांवर तिला मुंबईमध्ये न येण्याची धमकी देण्याचा आरोपही केला होता. तसेच मुंबईची तुलना POK सोबत केली होती. यानंतर, कंगनाच्या ट्विटवरून भडकलेल्या संजय राऊतांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाला हरामखोर मुलगी, असे म्हटले होते. या वक्तव्यावर चहू बाजूंनी राऊतांवर टिका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना हरामखोरचा अर्थ नॉटी, असा सांगितला होता. 

डलहौसीमध्ये सुरू आहे 'भूत पुलिस'ची शूटिंग -
सध्या पवन कृपलानी दिग्दर्शित हॉरर कॉमेडी फिल्म 'भूत पुलिस'ची शूटिंग हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथे सुरू आहे. यासाठी ते अॅक्टर्स सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडीस, यामी गौतम आणि प्रोड्यूसर्स रमेश तौरानी आणि अक्षय राय यांच्यासोबत हिमाचल प्रदेशात आहेत.
 

Web Title: kangana ranaut on shiv sena leader sanjay raut says no one be called haramkhor who makes money from himachal pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.