Join us  

कंगना राणौतने तापसी पन्नूला म्हटले ‘She-man’, संतापलेल्या युजर्सनी घेतली शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 10:24 AM

 मुद्दा कुठलाही असो कंगना बोलणार म्हणजे बोलणार. आता कंगना अशीच काही बरळली आहे...

ठळक मुद्देकंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती थलायवी या सिनेमात दिसणार आहे

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत  (Kangana Ranaut) तिच्या बयानबजीमुळे सतत चर्चेत असते. मुद्दा कुठलाही असो कंगना बोलणार म्हणजे बोलणार. आता कंगना अशीच काही बरळली आहे. तिचे एक ट्विट सध्या जाम चर्चेत आहे. या ट्विटमध्ये कंगनाने तापसी पन्नूला (Taapsee Pannu) ‘शी मॅन’ म्हटले आणि काय तर कंगना पुन्हा एकदा ट्रोल झाली.

कंगनाने एका ट्विटला रिप्लाय देताना हे ट्विट केले.  अर्बन डिक्शनरी नामक ट्विटर पेजचा एक फोटो तिने शेअर केला. ‘तापसी पन्लू बॉलिवूड अभिनेत्री आहे. जी तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाते. तिला कंगना राणौतची सस्ती कॉपी म्हटले जाते. ती पप्पू गँगची सदस्य आहे. तापसी पन्नूला कंगनाचे वॉलमार्ट व्हर्जनही म्हटले जाते,’ असे या पेजवर लिहिले होते. या पेजचा फोटो शेअर करत, कंगनानेही तापसीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ‘हा हा हा... शी-मॅन  आज खूप आनंदात असेन,’ असे तिने लिहिले.

लोकांनी केले ट्रोल, द्यावे लागले स्पष्टीकरण

कंगनाने तापसीला ‘शी-मॅन’ म्हणणे लोकांना आवडले नाही. अनेकांनी यावरून कंगनाला फैलावर घेतले. अखेर लोकांचा हा संताप बघून कंगनाला स्पष्टीकरण द्यावे लागले. ‘शी-मॅन असणे चुकीचे आहे? तिला ही उपमा देऊन मी काय चूक केली. ही तर तिच्या खंबीर व्यक्तिमत्त्वाचे कौतुक आहे. तुम्ही नकारात्मक विचार का करता, मला कळत नाही,’अशा शब्दांत कंगनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती थलायवी या सिनेमात दिसणार आहे. तिचा हा सिनेमा बनून तयार आहे. मात्र कोरोनामुळे सध्या या सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. याशिवाय धाकड आणि तेजस या सिनेमातही कंगना दिसणार आहे.

टॅग्स :कंगना राणौततापसी पन्नू