Join us  

कंगणा रणौतनं मुंबई महापालिकेला पाठवली नोटिस; मागितली 2 कोटींची नुकसान भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 4:20 PM

हे बांधकाम अनधिकृत असल्याचे महापालिका सिद्ध करू शकली नाही तर नुकसान भरपाई म्हणून २ कोटी रुपये कंगनाला द्यावे लागतील.  

अभिनेत्री कंगणा राणौत आणि  वादग्रस्त विधानं याचं जुनं नात आहे.  काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून  कंगना रणौतच्या बेकायशीर कार्यालयावर बुलडोजर चालवण्यात आलं होतं. सध्या हे प्रकरण न्यायालायापर्यंत पोहोचलं आहे. आता कंगना रणौतने मुंबई महापालिकेनं तिच्या ऑफिसचं बांधकाम बेकायदेशीरपणे तोडल्याचा आरोप करत महापालिकेकडून २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

कंगनाने महापालिकेच्या कारवाईविरोधात याआधी केलेल्या याचिकेत दुरुस्ती करत महापालिकेला २ कोटी रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही तिनं आता केली आहे. ४० टक्के मालमत्तेचं नुकसान झाल्याचा दावा कंगणानं केला आहे. या प्रकारणावर पुढच्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाडून सुनावणी होईल. हे बांधकाम अनधिकृत असल्याचे महापालिका सिद्ध करू शकली नाही तर नुकसान भरपाई म्हणून २ कोटी रुपये कंगनाला द्यावे लागतील.  

कंगनापासून बॉलिवूडमधील दिग्दर्शक राहतात दूर

ठाकरे सरकारसोबतच्या वादामुळे गेल्या काही दिवसांपासून कंगना राणौतची जोरदार चर्चा आहे. कंगना तशी स्वभावाने परखड. आपल्या या परखड स्वभावामुळे आपल्या फिल्मी करिअरमध्ये तिने अनेक वाद ओढवून घेतले आणि या वादांना पुरून उरली. यानंतर काय तर पंगा घेणारी अभिनेत्री अशीच तिची ओळख बनली. तिच्या या स्वभावामुळे बॉलिवूडचे काही दिग्दर्शक-निर्माते जाणीवपूर्वक कंगनापासून दूर राहतात, हे एक वास्तव आहे.

दिग्दर्शक विक्रम भटही यांना एका मुलाखतीत कंगनाबद्दल छेडले गेले. वादांच्या पार्श्वभूमीवर कंगनासोबत काम करण्याची संधी मिळाल्यास करणार का? असा प्रश्न त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर विक्रम यांनी अनोखे उत्तर दिले.‘मी तिच्यासोबत काय काम करणार? आजकाल ती स्वत:च सिनेमे दिग्दर्शित करतेय. मी तिच्यासोबत काम करणारच नाही, असे मी म्हणणार नाही. पण मी तिच्यासोबत करणार काय? तिच्यासोबत सिनेमा केला तर मला चित्रपटात क्लॅप मारावी लागेल. म्हणजे मी क्लॅप बॉयच्या भूमिकेत असेन. कारण कंगना स्वत:चा कथा लिहिते, स्वत:च दिग्दर्शित करते, अशात मला कामच उरणार नाही,’ असे विक्रम भट म्हणाले.

वाय दर्जाच्या सुरक्षेवर कंगनाचे उत्तर

शिवसेनेशी थेट पंगा घेऊन वादाच्या केंद्रस्थानी आल्यानंतर आता कंगना हिमाचल प्रदेशात परतली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि ड्रग्सच्या विषयावरून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केल्याने कंगना व शिवसेना यांच्यात वादाला तोंड फुटले होते. मुंबई मला असुरक्षित वाटत असल्याचे विधान तिने केले होते. यानंतर केंद्र सरकारने तिला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान या सुरक्षेसाठी केंद्र सरकार दहमहा लाखो रूपये खर्च करत असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयातील वकील ब्रिजेश कलाप्पा यांनी कंगनाला दिलेल्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला होता. एखाद्या व्यक्तिला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्राला महिन्याला 10 लाखांहून अधिक पैसे खर्च करावे लागतात. हा पैसा कर भरणाऱ्या लोकांचा आहे. कंगना आता हिमाचल प्रदेशात सुरक्षित आहे.

अशा स्थितीत मोदी सरकार तिला दिलेले संरक्षण हटवणार का? अशी विचारणा या वकिलाने केली होती. ब्रिजेश यांच्या प्रश्नाला कंगनाने उत्तर दिले आहे. ‘ब्रिजेशजी, मी काय विचार करते, तुम्ही काय विचार करता या आधारावर संरक्षण दिले जात नाही. इंटेलिजन्स ब्युरोकडून संभाव्य धोक्याचा तपास केला जातो. त्या धोक्याच्या आधारावर कुठल्या दर्जाचे संरक्षण पुरवायचे याचा विचार केला जातो. ईश्वराची इच्छा असेल तर पुढच्या काही दिवसांत मला दिलेले संरक्षण पूर्णपणे हटवलं जाईल. मात्र इंटेलिजन्स ब्युरोकडून खराब रिपोर्ट मिळाला तर कदाचित माझी सुरक्षा वाढवली जाईल, असं उत्तर कंगनाने दिलं आहे.

हे पण वाचा-

सुशांत सिंग राजपूतच्या फॉर्म हाऊसवर व्हायची ड्रग्स पार्टी?, NCBने तपासाची चक्र फिरवली

सुशांतला ब्लॅकमेल करत होता सॅम्युअल हाओकिप, रात्री 2 वाजता सोडले होते घर ?

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात 'हा' रिपोर्ट ठरणार महत्त्वाचा, हत्येच्या थेअरीचं मिळणार उत्तर

टॅग्स :कंगना राणौतमुंबई महानगरपालिका