Join us  

कंगनाने डिलीट केलेलं 'ते' ट्विट व्हायरल, शेतकरी आंदोलनातील वयोवृद्ध आजीची उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 3:54 PM

कंगना जे ट्विट रिट्विट केलं होतं त्यात शेतकरी आंदोलनात सहभागी वयोवृद्ध शेतकरी आजी शाहीन बागची बिलकिस बानो सांगितलं जात होतं.

कंगना रनौत तिच्या एका ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली. तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. कारण तिने सत्य न जाणून घेता शेतकरी आंदोलनातील एका फेक ट्विटला रिट्विट केलं होतं. ट्रोल झाल्यावर कंगनाने हे ट्विट डिलीट केलंय. लोकांना याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला आणि आता तिला पुन्हा ट्रोल केलं जातंय.

कंगना जे ट्विट रिट्विट केलं होतं त्यात शेतकरी आंदोलनात सहभागी वयोवृद्ध शेतकरी आजी शाहीन बागची बिलकिस बानो सांगितलं जात होतं. यात लिहिले होते की, आजीकडून हे काम करून घेतलं जातं. कंगनाने लिहिले होते की, 'हा हा हा ही तिच आजी आहे जिला टाइम्स मॅगझीनने भारतातील सर्वात पॉवरफुल लोकांमध्ये सहभागी केलं होतं. ती १०० रूपयात अव्हेलेबल आहे. पाकिस्तानातील पत्रकारांनी इंटरनॅशनल पीआरला भारतासाठी हायर केलं आहे. आपल्याला आपले असे लोक हवेत जे आपल्यासाठी इंटरनॅशनली आवाज उठवू शकतील.

ट्रोल होताच डिलीट केलं ट्विट

कंगनाचं हे ट्विट येताच सोशल मीडिया यूजर्सनी तिला ट्रोल करणं सुरू केलं होतं. तेव्हा कंगनाने ट्विट डिलीट केलं होतं. यानंतरही एका यूजरच्या पोस्टवर तने लिहिले की, 'जास्त एक्सायटेड होत आहे...जास्त एक्साइटमेंट तुमच्यासारख्या जयचंदसाठी चांगलं नाही. ही फेक न्यूज नाहीये. माझे सोर्स अजूनही व्हेरिफाय करत आहेत. यावर यूजरने तिला विचारले की, तुझे सोर्स कोण आहे?

कोण आहे बिलकिस बानो?

बिलकिस बानो(८२) जिला शाहीन बाग दादीही म्हटलं जातं. त्या CAA-NRC प्रोटेस्टचा चेहरा बनली होती. हजारो शेतकरी केंद्राच्या कृषी बिलाला विरोध करत आहे. या विरोध प्रदर्शनात वयोवृद्ध आजीचे फोटो समोर आले होते.  कंगनाने दोन्ही एकच असल्याचं सांगितलं होतं. 

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडसोशल व्हायरलसोशल मीडिया