Join us

कंगनासह आईने ही पुढे केला मदतीचा हात, पीएम केअर फंडला दिली महिन्याची पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 14:48 IST

कंगनाची बहीण रंगोलीने याचा खुलासा केला.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या ३३८ पोहोचली आहे. याशिवाय, २४ हजारहून अधिक लोकांना होम क्वारंटाइन केले आहे. देशात परिस्थिती अतिशय भयाण असून अनेकजण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता पर्यंत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी पीएम केअर फंडला डोनेशन दिले आहे. आता यायादीत कंगना राणावतचे नावदेखील सामील झाले आहे. कंगनाने पीएम केअर फंडला 25 लाखांची मदत केली आहे. याचसोबत कंगनाची आई आशा राणावत यांनी देखील आपली महिन्याची पेन्शन पीएम फेअर फंडला दिली आहे. कंगनाची बहीण रंगोलीने याचा खुलासा केला.

रंगोलीने ट्विट केले आहे की, कंगनाने पीएम केअर फंडला 25 लाख दिले तसेच कामगारांच्या कुटुंबाना रेशन दिले आहे. आपल्या सगळ्यांना एकत्र उभं राहण्याची गरज आहे. नरेंद्र मोदी यांचे आमच्या कुटुंबीयांकडून आभार.

रंगोलीने आणखी एक ट्वीट केले आहे यात ती लिहिते, माझ्या आईने आपली महिन्याच्या पेन्शन दिली आहे. आपल्याला नाही माहिती लॉकडाऊन अजून किती काळ चालले, अशा परिस्थिती आपल्याकडे जे आहे त्याचसोबत आपल्याला जगायचे आहे. पण आपण देशासाठी थोडं एडजस्ट करु शकतो. नरेंद्र मोदीजी तुमचे आभार, आम्हाला मदत करण्याची संधी दिल्याबद्दल. अशा आशायाचे ट्वीट रंगोलीने केले आहे.

टॅग्स :कंगना राणौतकोरोना वायरस बातम्या