Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हीआयपी’ मध्ये धनुषसोबत काजोलचा जलवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 19:56 IST

‘दिलवाले’ मधून काजोलने दमदार कमबॅक केले. बॉलिवूडमध्ये तिने काही चित्रपट साईन करणार आहेच पण तिने आता तिचा मोर्चा दाक्षिणात्य ...

‘दिलवाले’ मधून काजोलने दमदार कमबॅक केले. बॉलिवूडमध्ये तिने काही चित्रपट साईन करणार आहेच पण तिने आता तिचा मोर्चा दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळवला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता-निर्माता धनुष आणि रजनीकांतची मुलगी सौंदर्या यांनी मिळून ‘वेला इला पत्ताथारी’ म्हणजेच ‘व्हीआयपी’ या तमिळ चित्रपटाच्या  सिक्वेलमध्ये अभिनेत्री काजोल हिला धनुषसोबत घेण्यात आले आहे. धनुषने चित्रपटाचे संवादही लिहिले आहेत. थोडक्यात काय तर, धनुषसारख्या कलाकारासोबत काजोलचा जलवा प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे.सौंदर्या आणि धनुष यांनी काजोलसोबत चित्रपटाविषयी चर्चा केली. सुत्रांनुसार, काजोलसोबत स्क्रिप्ट शेअर करण्यात आली आहे. काजोलला स्टोरी आवडली असून तिनेही ताबडतोब संमती देऊन टाकली आहे. चित्रपटाच्या तारखांबाबत गोंधळ कायम असून तिच्यासोबत तारखा कशा जमतील याविषयीही चर्चा सुरू आहे. लवकरच काजोल चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार असल्याचे कळतेय.