Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहले मुंह तो धो लेतीं, काजोल नो मेकअप लूकमधील व्हिडीओ शेअर करताच झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 16:39 IST

काजोलचा एक व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे.

काजोल नव्वदच्या दशकातील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. काजोलने तिच्या चित्रपटाच्या प्रवासात आतापर्यंत सहा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी काजोलने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. तिचा पहिला बॉलिवूड डेब्यू 'बेखुदी' होता. काजोल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. काजोलचा असाच एक व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमुळे काजोल ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. 

काजोलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, 'माझी स्किनकेअर दिनचर्या थेट माझ्या मॉइश्चरायझरपासून सुरू होते'. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला  एका इंग्लिश गाणं सुरु आहे. या गाण्याचे बोल कॉपी करत काजोल स्वत: हे गाणं गाते आणि चेहऱ्यावर  मसाज करताना दिसतेय. 

विशेष म्हणजे या व्हिडीओत काजोल विनामेकअप लूकमध्ये दिसतेय. काजोलचा हा व्हिडीओ पाहून यूजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.  एका यूजरने लिहिले, ' मुंह तो धो लेती'तर दुसऱ्याने लिहिले, गाण्याच्या शब्दांसोबत तुझे लिप्सिंग मॅच होत नाही आहे. . काजोलचे इन्स्टाग्रामवर 11.1 मिलियन जास्त फॉलोअर्स आहेत. अखेरची ती 'त्रिभंग' सिनेमात दिसली होती.  

टॅग्स :काजोल