Join us

चंद्राची वाट बघून बघून काजोल वैतागली, फोटो शेअर करत लिहिले - जर जेवण नाही मिळालं तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 12:14 IST

काजोलने हा फोटो एका फनी कॅप्शनसोबत शेअर केला आहे. जे लोकांना फारच पसंत पडत आहे. फॅन्स यावर भरभरून कमेंट करत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री काजोल काही दिवसांपासून मुलगी न्यासासोबत सिंगापूरमध्ये राहत आहे. आणि यावेळी काजोलने करवा चौथचा व्रत सिंगापूरमध्येच साजरा केला. करवा चौथच्या निमित्ताने काजोलने इन्स्टाग्रामवर फारच फनी फोटो शेअर केला. ज्यात ती चंद्राची वाट पाहत विचित्र हावभाव करताना दिसत आहे. केवळ इतकंच नाही तर काजोलने हा फोटो एका फनी कॅप्शनसोबत शेअर केला आहे. जे लोकांना फारच पसंत पडत आहे. फॅन्स यावर भरभरून कमेंट करत आहेत.

काजोलने इन्स्टाग्रामवर करवा चौथचे काही फोटो शेअर केले आहेत आणि या अल्बमला 'हंगर गेम्स सीरीज' असं नाव दिलं आहे. या फोटोत काजोल लाल रंगाच्या साडीत फारच सुंदर दिसत आहे. कॅमेराकडे बघून वेगवेगळ्या पोज देत आहे.  काजोलने ५ फोटो शेअर केलेत आणि प्रत्येकाला वेगवेगळं कॅप्शन दिलं आहे. (करवा चौथ निमित्ताने काजोलचा देशातील पतींना खास सल्ला, शेअर केलं मजेदार मीम)

चांद का इंतजार बेहद धैर्यपूर्वक और प्यार के साथ 

धीरे- धीरे खो रहा है

सीरियल किलर हो रहा है

अगर खाना नहीं मिला तो

हे भगवान आसमान में नहीं तो सही फोन पे तो चांद दिखा दे 

काजोलने करवा चौथवर बुमरॅंग व्हिडीओही शेअर केला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिले की, 'टू मून..हंगर गेम्स सुरू'. काजोल तिची मुलगी न्यासासोबत सप्टेंबरपासून सिंगापूरला राहत आहे. तिच्या मुलीची शाळा पुन्हा सुरू झाली आहे आणि अजय देवगन मुलगा युगसोबत मुंबईत राहत आहे. 

कालच काजोलने करवा चौथ निमित्त एक मजेदार मीम शेअर केलं होतं. काजोल व्दारे शेअर करण्यात आलेल्या या मीमवर लिहिले आहे की, 'कार चालवताना सीटबेल्ट बांधा, बाइक चालवताना हेल्मेट घाला, करवा चौथच्या भरोशावर राहू नका'. दरम्यान काजोल सध्या मुलगी न्यासासोबत सिंगापूरमध्ये आहे. सिंगापूरहून काजोल तिचे फोटो शेअर करत राहते. काही दिवसांपूर्वीच काजोलने मुलगी न्यासाच्या फोटोग्राफीची प्रशंसा करत तिने काढलेले काढलेले फोटो शेअर केले होते. 

टॅग्स :काजोलबॉलिवूड