करवा चौथ निमित्ताने काजोलचा देशातील पतींना खास सल्ला, शेअर केलं मजेदार मीम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 10:32 AM2020-11-04T10:32:57+5:302020-11-04T10:33:58+5:30

काजोलने करवा चौथबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर झाली आहे. काजोलने एक मीम शेअर करत पतींना एक मोलाचा सल्ला दिला आहे.

Karwa Chauth 2020 : Kajol shares meme safety advice ahead festival | करवा चौथ निमित्ताने काजोलचा देशातील पतींना खास सल्ला, शेअर केलं मजेदार मीम

करवा चौथ निमित्ताने काजोलचा देशातील पतींना खास सल्ला, शेअर केलं मजेदार मीम

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री काजोलसोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव राहते. काजोल नेहमीच तिचे खास फोटो आणि मजेदार मीम्स सोशल मीडियावर शेअर करत राहते. नुकतीच काजोलने करवा चौथबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर झाली आहे. काजोलने एक मीम शेअर करत पतींना एक मोलाचा सल्ला दिला आहे.

काजोल व्दारे शेअर करण्यात आलेल्या या मीमवर लिहिले आहे की, 'कार चालवताना सीटबेल्ट बांधा, बाइक चालवताना हेल्मेट घाला, करवा चौथच्या भरोशावर राहू नका'. दरम्यान काजोल सध्या मुलगी न्यासासोबत सिंगापूरमध्ये आहे. सिंगापूरहून काजोल तिचे फोटो शेअर करत राहते. काही दिवसांपूर्वीच काजोलने मुलगी न्यासाच्या फोटोग्राफीची प्रशंसा करत तिने काढलेले काढलेले फोटो शेअर केले होते.

काही दिवसांपूर्वी एका यूजरने काजोलला विचारले होते की, ती तिच्या मुलीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे का? यावर काजोल म्हणाली होती की, नाही. न्यासाही आता १७ वर्षांची आहे आणि तिला बॉलिवूडमध्ये काहीही इंटरेस्ट नाही. सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर होताच व्हायरल होतात. पण न्यासाला लाइमलाईट अजिबात पसंत नाही.

काजोलच्या वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर ती 'तान्हाजी' या सिनेमात दिसली होती. या सिनेमात बऱ्याच वर्षांनी ती पती अजय देवगनसोबत दिसली होती.  अजय देवगनने या सिनेमात तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती. तर काजोलने त्यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर काजोलने देवी या शॉर्टफिल्ममध्येही काम केलं. आता 'त्रिभंगा'च्या माध्यमातून ती नेटफ्लिक्सवर डेब्यू करणार आहे.
 

Web Title: Karwa Chauth 2020 : Kajol shares meme safety advice ahead festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.