अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २' सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमात अजय देवगण पुन्हा जस्सीची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील 'पहला तू, दुजा तू' हे गाणं रिलीज झालं. या गाण्यात अजय देवगणने केलेल्या डान्स स्टेपची चांगलीच चर्चा झाली. कोणताही वेगळा डान्स न करता फक्त बोटांच्या हालचालीने अजयने हा डान्स केला. अजय देवगणच्या या डान्सची नेटकऱ्यांनी चांगलीच उडवली. या डान्सवर अजयची पत्नी आणि अभिनेत्री काजोलने प्रतिक्रिया दिली
अजय हा बेस्ट डान्सर आहे
सोशल मीडियावर मिस मालिनीने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत काजोलला अजय देवगण-मृणाल ठाकूरचा हा फिंगर डान्स दाखवण्यात आला. हा डान्स पाहून काजोलही हसली. म्हणाली- "मला वाटतं की अजय देवगण हा फिल्म इंडस्ट्रीमधील बेस्ट डान्सर आहे. कारण अजय हा एकमेव असा अभिनेता आहे जो फक्त त्याच्या बोटांच्या साहाय्याने डान्स करु शकतो.", अशा शब्दात काजोलने तिची खास प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय अजयचंही कौतुक केलं.