काजोल बॉलिवूडच्या गुणी अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोल एक प्रगल्भ अभिनेत्री आहे, यात काहीही शंका नाही. पण एक प्रगल्भ अभिनेत्री असण्यासोबतच काजोलमध्ये आणखी एक गुण आहे. तो म्हणजे, ती शब्द राखणारी अभिनेत्री आहे. शब्द दिला की, तो पाळायचाच, हा तिचा स्वभाव. तिच्या याच स्वभावामुळे तिने बॉलिवूडच्या नव्या पिढीसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. होय, अनेक अभिनेत्री करू शकत नाही, ते काजोलने केले आहे. होय, गत २५ वर्षांत काजोलने आपल्या करिअरमध्ये एकदाही आपले कुठले शूटिंग शेड्यूल रद्द केलेले नाही. मग ती बिमार असो की काहीही होवो. निर्मात्यांचे नुकसान होता कामा नये, या मताची ती आहे. त्यामुळेच कुठल्याही स्थितीत शूटींग रद्द होता कामा नये, हा तिचा आटोकाट प्रयत्न असतो.
अलीकडे एका कार्यक्रमात काजोलने याचा खुलासा केला. गेल्या २५ वर्षांत मी एकही दिवस शूटींग रद्द केलेले मला आठवत नाही. इतक्या वर्षांत फक्त एकदाच मी सुट्टी घेतली होती. तीही न्यासासाठी. ती प्रचंड आजारी होती. तिला १०४ डिग्री ताप होता. केवळ त्यादिवशी मी माझ्या निर्मात्यांना फोन करून मी आज कामावर येऊ शकत नाही, असे सांगितले होते. स्वत:साठी म्हणाल तर मी एकही दिवस शूटींग रद्द केले नाही. आजारपणातही मी शूटींग केलेय, असे काजोलने यावेळी सांगितले. या इंडस्ट्रीत एक दिवसाचे शूटींग रद्द करणे म्हणजे, निर्मात्यांचे लाखोंचे नुकसान करणे होय. त्यामुळे इथे काम करताना कलाकारावर एक मोठी जबाबदारी असते आणि मी कायम या जबाबदारीचे भान ठेवले आहे, असेही ती म्हणाली.
ALSO READ : SEE PICS : ‘कुछ कुछ होता है’ पार्ट २ बघायचायं? मग शाहरूख खान व काजोलचे हे फोटो पाहाच!!
काजोलने फार निवडक चित्रपटांत काम केले आहे. पण या सर्व चित्रपटांनी काजोलला आघाडीच्या अभिनेत्रींच्या रांगेत बसवले. ‘बाजीगर’,‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’,‘कभी खुशी कभी गम’,‘माय नेम इज खान’ अशा अनेक चित्रपटांत काजोलने काम केलेय.
२५ वर्षांच्या करिअरमध्ये काजोलने एकदाही केली नाही ‘ही’ गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 15:41 IST