Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासादरम्यान काजोलच्या बॅगेत कायम असतं 'काळे मीठ', त्यामागचं कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 10:46 IST

एका मुलाखतीत काजोलने हा खुलासा केला. प्रवासादरम्यान 'काळे मीठ' कायम सोबत ठेवण्याचं कारणही तिनं सांगितलं. 

Kajol Always Carries Kaala Namak : लोक प्रवासात आपल्या बॅगमध्ये काहीतरी खाण्यासाठी नक्कीच ठेवतात. कुणाकडे आंबट गोळ्या असतात, कुणाकडे फळं, आवडीचे खाऊ, बिस्किटांचे पुडे  किंवा चिप्स असतात.  विशेषतः सेलिब्रिटींच्या बॅगेत तर महागडे परफ्यूम्स, मेकअपचे सामान किंवा महागड्या वस्तू असतील असाच आपला समज असतो. मात्र, बॉलिवूडची लाडकी अभिनेत्री काजोल याला अपवाद ठरली आहे.  काजोलने एक असा खुलासा केला आहे, जो ऐकून तिचे चाहतेही थक्क झाले आहेत. प्रवासादरम्यान काजोल आपल्याजवळ 'काळे मीठ' ठेवते. एका मुलाखतीत काजोलने हा मजेशीर खुलासा केला. प्रवासादरम्यान 'काळे मीठ' कायम सोबत ठेवण्याचं कारणही तिनं सांगितलं. 

काजोल म्हणाली, "मी कायम माझ्याबरोबर काळे मीठ ठेवते. मला ते खूप आवडते. ही गोष्ट कायम माझ्याजवळ असते. कधीकधी मला वाटते की जेवणात मीठ कमी आहे, त्यावेळी मी हे मीठ वापरते. सामान्य मिठाला नसलेली एक वेगळी चव काळ्या मिठाला असते. तुम्ही ते चिप्सवर लावू शकता किंवा तुमच्या कोणत्याही आवडत्या पदार्थावर टाकून त्याचा आनंद घेऊ शकता". 

काजोलची ही सवय थोडीशी हटके वाटत असली, तरी ती खूपच उपयोगी आहे. काळे मीठ हे आरोग्याच्या दृष्टीनेही काळे मीठ अत्यंत गुणकारी मानले जाते. काळे मीठ पचनसंस्थेसाठी उत्तम असते. गॅस, अपचन किंवा पोट फुगणे यांसारख्या समस्यांवर हे रामबाण उपाय आहे. सामान्य मिठाच्या तुलनेत यात सोडिअमचे प्रमाण कमी असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते.  यात लोह आणि इतर खनिजे मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराला नैसर्गिक पोषण देतात. लिंबू पाणी किंवा कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्याने चयापचय क्रिया सुधारते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kajol's Travel Secret: Why She Always Carries Black Salt

Web Summary : Kajol revealed she always carries black salt while traveling. She adds it to food for better taste and digestion. Black salt aids digestion, reduces bloating, and controls blood pressure compared to common salt. It's a healthy travel companion.
टॅग्स :काजोलबॉलिवूड