Join us

पतीसोबत रोमँटिक डिनर डेट, काजल अग्रवालचे हॅप्पी मोमेन्ट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 16:02 IST

अभिनेत्री काजल आणि गौतमने 30 ऑक्टोबर रोजी मुंबईत पंजाबी आणि काश्मिरी पद्धतीने लग्न केले.

काजल अग्रवाल आणि गौतम किचलूचे लग्न झाल्यापासून सोशल मीडियावर कपल एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना नेहमी दिसतात. अलीकडेच काजल पती गौमत किचूलसोबत रोमँटिक डिनर डेटवर गेली होती. काजोल आणि गौतमचा  एका सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. यात दोघे डिनर डेटवर गेल्याचे दिसतायेत. 

30 ऑक्टोबरला झाले लग्न  अभिनेत्री काजल आणि गौतमने 30 ऑक्टोबर रोजी मुंबईत पंजाबी आणि काश्मिरी पद्धतीने लग्न केले. लग्नाची प्रत्येक अपडेट ती सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत होती. कोरोनामुळे, केवळ खास लोक लग्नाला उपस्थित होते.

मालदीवला गेले होते हनूमीनसाठी काजलची बहीण निशा म्हणाली होती, 'लग्नानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी नवीन घरात प्रवेश केल्यापासून सुरुवात झाली. ही सुंदर आणि पारंपारिक परंपरा होती. दोघेही आनंदी होते. नवीन घरात सेटल झाल्यानंतर हे कपल हनिमूनसाठी मालदीवला रवाना झाले.

मुंबई सागामध्ये दिसणार काजोलकाजल आता 'मुंबई सागा' सिनेमात झळकणार  आहे. दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या या अ‍ॅक्शन एंटरटेन्टरमध्ये जॉन अब्राहम, इमरान हाश्मी, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रेतिक बब्बर, गुलशन ग्रोव्हर, अमोल गुप्ते, रोहित रॉय यांच्यासारखे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

टॅग्स :काजोल