काजल अग्रवालच्या मॅनेजरला ड्रग्ज प्रकरणात अटक; काजलने म्हटले अटक योग्यच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 21:41 IST
साउथ इंडस्ट्रीमधील स्टार आणि ड्रग्ज प्रकरण हे जणू काही समीकरणच बनत चालले आहे. कारण गेल्या काही वर्षांत साउथ स्टारशी ...
काजल अग्रवालच्या मॅनेजरला ड्रग्ज प्रकरणात अटक; काजलने म्हटले अटक योग्यच!
साउथ इंडस्ट्रीमधील स्टार आणि ड्रग्ज प्रकरण हे जणू काही समीकरणच बनत चालले आहे. कारण गेल्या काही वर्षांत साउथ स्टारशी संबंधित ड्रग्ज प्रकरणे एकापाठोपाठ उलगडत आहेत. सध्या अशाच काहीशा प्रकरणामुळे अभिनेत्री काजल अग्रवाल हिचे नाव चर्चेत आले आहे. होय, काजलचा मॅनेजर राजा रॉनी याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. राजाच्या अटकेमुळे या प्रकरणात आणखी काही लोकांचे हात गुंतलेले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, राजा रॉनीला गेल्या सोमवारी त्याच्या हैदराबाद येथील घरातून एसआयटीच्या टीमने अटक केली आहे. वृत्तानुसार राजा रॉनी याच्या घरातून मोठ्या प्रमाणात गांजा (मॅरिजुआना) जप्त करण्यात आला आहे. एसआयटीच्या टीमला संशय आहे की, रॉनीची ड्रग्ज डिलर्ससोबतदेखील ओळख असावी. सोमवारी एसआयटीने अभिनेता नवदीप याची तब्बल ११ तास चौकशी गेली. तरीदेखील एसआयटीच्या टीमचे समाधान झालेले नाही. त्यामुळे नवदीपला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलाविले जाण्याची शक्यता आहे. या अगोदर पुरी जगन्नाथ याच्यासह टॉलीवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींची चौकशी केली गेली. त्याचबरोबर काही सेलिब्रिटी अजूनही एसआयटीच्या रडारवर आहे. त्याचबरोबर डसनभर टॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींना एसआयटीने समन्स बजावल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी काही सेलिब्रिटींना एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. आज सकाळीच ‘सीएनएक्स’ने आयटम गर्ल मुमैत खानला एसआयटीने ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलाविल्याचे वृत्त दिले होते. दरम्यान, काजल अग्रवाल हिला जेव्हा याविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, पोलीस कायदेशीररीत्या सर्व काम करीत आहेत. या प्रकरणातील खरे वास्तव सर्वांसमोर यावे हीच माझी अपेक्षा आहे. पोलिसांनी जर राजा रॉनीला अटक केली असेल तर ती योग्यच असेल. राजा रॉनी हे नाव टॉलिवूडमधील मोठे नाव असून, काजल व्यतिरिक्त तृप्ती आणि राशी खन्ना यांसारख्या बड्या स्टार्सच्या मॅनेजमेंटची जबाबदारी त्याच्याकडे आहे. दरम्यान, काजल सध्या मुंबई येथे असून, आगामी ‘यमला पगला दिवाना’च्या तिसºया सीजनची शूटिंग करीत आहे.