सलमानच्या हेअरस्टाईलमुळे कबीर खान भडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 10:44 IST
कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाईट’ सिनेमातील सलमानच्या हेअरस्टाईलवरून सध्या सेटवर तणावाचे वातावरण आहे. कबीर चित्रपटाच्या हेअरस्टायलिस्टवर प्रचंड नाराज असून दोघांमध्ये ...
सलमानच्या हेअरस्टाईलमुळे कबीर खान भडकला
कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाईट’ सिनेमातील सलमानच्या हेअरस्टाईलवरून सध्या सेटवर तणावाचे वातावरण आहे. कबीर चित्रपटाच्या हेअरस्टायलिस्टवर प्रचंड नाराज असून दोघांमध्ये सर्व क्रु मेंबर्ससमक्ष कडाक्याचे भांडणसुद्धा झाल्याचे कळतेय.चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात सलमान सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मनाली येथे पहिल्या टप्प्यातील शूटींग संपल्यानंतर कबीरने ते फुटेज पाहिले. काही शॉटस्मध्ये सलमानचा लूक त्याला हवा तितका आवडला नाही. त्याची हेअरस्टाईल कबीरला बिल्कुल आवडली नाही.यावरून मग जेव्हा त्याने हेअरस्टायलिस्टला विचारणा केली तेव्हा दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. वाद एवढा विकोपाला गेला की, कबीरचे असे रुप पाहून संपूर्ण युनिट आवाक झाले. त्याला एवढे चिडलेले यापूर्वी कोणीच पाहिले नव्हते. तसे पाहिले तर तो खूप शांत आहे आणि टीमवर्कमध्ये विश्वास ठेवणारा लीडर आहे. परंतु सिनेमातील प्रत्येक छोटी गोष्टसुद्धा एकदम परफेक्ट असावी, असा त्याचा कटाक्ष असतो. ट्युबलाईट : सलमान खानयाप्रकारणावर सलमानने तरी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. सल्लूमियांच्या प्रत्येक चित्रपटात त्याची हेअरस्टाईल प्रमुख आकर्षण असते. त्याच्या हेअरस्टाईलची क्रेझ पाहता कबीर कोणतीच कमी ठेवू इच्छित नाही. त्यामुळेच तो एवढा भडकला असावा, असे सुत्रांनी सांगितले.पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सलमान एका चीनी मुलीच्या प्रेमात पडतो अशी कथेची मांडणी सांगितली जातेय. यामध्ये सलमानसोबत प्रथमच चीनी अभिनेत्री झु झु मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे. तसेच त्याचा भाऊ सोहेल खानसुद्धा रुपेरी पडद्यावर मोठ्या कालावधीनंतर रुपेरी पडद्यावर पुन्हा दिसणार आहे.कबीर खानसोबत सलमानचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी दोघांनी ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या दोन ब्लॉकबस्टर सिनेमांत एकत्र काम केले आहे. दोन्हीही चित्रपटांची बॉक्स आॅफिस धमाल ‘ट्युबलाईट’ आणखी पुढे नेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.