Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kaabil Screening : हृतिक रोशन आणि सुझैन खान यांच्यात आले पुन्हा प्रेम ऊतू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 12:12 IST

राकेश रोशन निर्मित ‘काबील’ चित्रपट २५ जानेवारीला रिलीज होतोय. हृतिक रोशन आणि यामी गौतम या क्युट जोडीने यात अंध ...

राकेश रोशन निर्मित ‘काबील’ चित्रपट २५ जानेवारीला रिलीज होतोय. हृतिक रोशन आणि यामी गौतम या क्युट जोडीने यात अंध कपलची भूमिका साकारलीय. ‘रईस’ आणि ‘काबिल’ यांचा बॉक्स आॅफिस क्लॅश होणार माहित असून देखील राहूल ढोलकिया आणि राकेश रोशन यांनी त्यांच्या रिलीज डेट मागे घेतल्या नाहीत. यानिमित्ताने प्रेक्षकांना ‘काँटें की टक्कर’ अनुभवायला मिळणार आहे. कालच ‘काबिल’ची स्पेशल स्क्रिनिंग झाली. या स्क्रिनिंगला ‘बी टाऊन’ मधील सर्व तारे-तारकांनी हजेरी लावली. ऋषी कपूर, नीतू कपूर आणि जायेद खान यांच्यासह रोशन खानदानातील सर्वजण या स्क्रिनिंगला आले होते. २०१४ मध्ये हृतिक रोशन आणि सुझैन खान यांच्या झालेल्या घटस्फोटानंतरही एक्स-वाईफ सुझैनने या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. हृतिक आणि सुझैन यांच्या नात्यातील कटुता आता कमी होतेय की काय? असे कालच्या स्क्रिनिंगवेळी दिसून आले. AlSO READ : ​हृतिक व सुजैन पुन्हा येणार का एकत्र?२०१४ मध्ये हृतिक रोशन आणि सुझैन खान यांनी घटस्फोट घेतल्यानंतरही अलीकडेच ते दुबईत मुले रेहान आणि ह्रीदान यांच्यासाठी एकत्र आले होते. फॅमिली गेटटुगेदर आणि पार्टीमध्ये ते दोघे यावेळी एकत्र एन्जॉय करताना दिसले. त्यांचा एकमेकांसोबतचा सहवास वाढल्याने कदाचित त्यांना पुन्हा एकदा ‘लाईफ पार्टनर’ होण्याची इच्छा निर्माण झाली असावी, असे दिसतेय. काल झालेल्या या स्पेशल स्क्रिनिंगवेळी तिने ‘काबिल’ मधील हृतिकच्या अभिनयाचे कौतुक के ले. तिने इन्स्टाग्रामवर एका फोटोसह तिची प्रतिक्रिया नोंदवली. ‘हृतिकचे नाव न टाकता तिने केवळ ‘सो अ‍ॅण्ड सो’ असे लिहीत मला तुझा अभिमान वाटतो.’ असे कॅप्शन दिले आहे. या फोटोत ती हृतिकला मिठी मारतांना दिसते आहे. AlSO READ : दुबईत मुलांसोबत हृतिक-सुझैन व्हॅकेशन्सवर..!