Join us

​असाच हिरो हवा! उर्वशीने ठेवली अट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 20:50 IST

उर्वशी रौतेला म्हणजे बॉलिवूडची अगदी नवखी अभिनेत्री. उण्यापुºया तीन चित्रपटात ती दिसली. नुकताच आलेला तिचा ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ हा ...

उर्वशी रौतेला म्हणजे बॉलिवूडची अगदी नवखी अभिनेत्री. उण्यापुºया तीन चित्रपटात ती दिसली. नुकताच आलेला तिचा ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. मात्र तरिही उर्वशी या चित्रपटात भाव खावून गेली, हे मात्र खरे.तुला भविष्यात कुठल्या अभिनेत्यांसोबत काम करायला आवडेल, असा प्रश्न अलीकडे एका मुलाखतीत  सेक्सी अ‍ॅण्ड हॉट उर्वशीला विचारण्यात आला. खरे तर अन्य अभिनेत्रींप्रमाणे उर्वशी यावर डिप्लोमॅटिक उत्तर देऊ शकली  असती. पण उर्वशीने या प्रश्नाला अगदी बेधडक उत्तर दिले. केवळ उत्तरच नाही तर काही अटी व शर्थीही तिने ठेवल्या. मला सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, हृतिक रोशन आणि अक्षय कुमार यांच्यासोबत काम करायला आवडेल. पण मला सगळे ‘टॉल’(उंच)अ‍ॅक्टरच हवेत, ‘शॉर्ट’(ठेंगणा) नको. कारण जोडी एकमेकांना अनुरूप दिसायला हवी,अशी एक अटही तिने सांगितली. व्वा, उर्वशी..मान गये... सगळ्या अभिनेत्यांनी उर्वशीची ही अट ऐकली असावी, अशी आशा करूयात!