Join us
Daily Top 2Weekly Top 5

"वडिलांची बरोबरी करायला मला आयुष्य लागेल"; जुनैद खानचं मोठं विधान, मनातलं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:35 IST

अभिनेत्री साई पल्लवीसोबतच्या 'एक दिन' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने ही प्रांजळ कबुली दिली. याशिवाय आमिर खानसोबत होणाऱ्या तुलनेवरही जुनैदने त्याचं मत मांडलं आहे.

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानचा मुलगा जुनैद खान सध्या चर्चेत आहे. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या 'स्टार किड' या ओळखीबद्दल जुनैदने भाष्य केले आहे. अभिनेत्री साई पल्लवीसोबतच्या 'एक दिन' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने ही प्रांजळ कबुली दिली. याशिवाय आमिर खानसोबत होणाऱ्या तुलनेवरही जुनैदने त्याचं मत मांडलं आहे.

गप्पांमध्ये साई पल्लवीने जुनैदला विचारले की, आमिर खानचा मुलगा असल्यामुळे त्याला कधी 'स्टार किड' असल्याने अडचण जाणवली का? यावर उत्तर देताना जुनैद म्हणाला, "आमिर खानच्या मुलाची ओळख तुम्ही कधीही पुसू शकणार नाही. हे सकारात्मक किंवा नकारात्मक नाही, तर एक वास्तव आहे. त्यांनी गेल्या ३५ वर्षांपासून यश आणि स्टारडम मिळवले आहे. मी इतक्या लवकर त्यांची बरोबरी करू शकत नाही, तिथपर्यंत पोहोचायला मला संपूर्ण आयुष्य लागेल. त्यामुळे भविष्यात मी कितीही चांगले काम केले, तरी लोक मला नेहमी आमिर खानचा मुलगा म्हणूनच ओळखतील."

जुनैदने २०२४ मध्ये नेटफ्लिक्सवरील 'महाराज' चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. जुनैदचा तिसरा चित्रपट 'एक दिन' १ मे २०२६ रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली बनलेल्या आणि सुनील पांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे ३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जुनैदने सांगितले की, तो सध्या आपल्या अभिनयात सुधारणा करण्यावर आणि कामाचा आनंद घेण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Junaid Khan: Lifetime needed to equal father Aamir Khan.

Web Summary : Junaid Khan, Aamir Khan's son, acknowledges his 'star kid' status. He says he needs a lifetime to match his father's achievements. He debuted with 'Maharaj' and his film 'Ek Din' released recently.
टॅग्स :जुनैद खानआमिर खानबॉलिवूड