Join us  

अगं पँट घालायची विसरलीस का? करण जोहरच्या पार्टीत फक्त ब्लेजर घालून पोहोचली कियारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 12:57 PM

Kiara advani: सध्या कियाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

बॉलिवूडमधील मोस्ट ब्युटीफूल आणि टॅलेंटेड अभिनेत्री म्हणजे कियारा आडवाणी (kiara advani). गेल्या काही काळात 'कबीर सिंग', 'शेरशाह', 'गुडन्यूज' असे काही सुपरहिट चित्रपट देऊन कियारा रातोरात लोकप्रिय झाली. त्यामुळे आजकाल तिच्याविषयीचे प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामध्येच सध्या कियाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

अलिकडेच करण जोहरच्या घरी 'जुग जुग जियो'च्या (jug jugg jeeyo) सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये कियारादेखील उपस्थित होती. मात्र, तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिच्यावर ट्रोल व्हायची वेळ आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ विरल भय्यानी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कियाराने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर ग्रीन पेस्टल रंगाचं ओव्हर साईज ब्लेजर परिधान केला होता. परंतु, तिचा हा आऊटफिट पाहिल्यावर तिला अनेकांनी ट्रोल केलं.

कियाराने केलेला हा लूक नेटकऱ्यांना अपूर्ण असल्यासारखा वाटत असल्यामुळे त्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 'ताई, पँट घालायची विसरलीस का?' असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. तर, 'ब्लेजरसोबत एक पँट पण घ्यायची होती', असंही एकाने म्हटलं आहे. 

टॅग्स :कियारा अडवाणीसेलिब्रिटीबॉलिवूडकरण जोहर