Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुबिन नौटियालने गुपचूप केलं लग्न, उत्तराखंडच्या निसर्गरम्य वातावरणात पार पडला सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:08 IST

कोण आहे जुबिन नौटियालच्या आयुष्यातली 'धून'?

बॉलिवूडचा लोकप्रिय पार्श्वगायक जुबिन नौटियालने आपल्या लाखो चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. 'रातां लंबियां' आणि 'लुट गए' सारख्या सुपरहिट गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या जुबिनने लग्नगाठ बांधली आहे. उत्तराखंडच्या निसर्गरम्य वातावरणात पारंपरिक पद्धतीने हा विवाहसोहळा संपन्न झाला. ना कोणता गाजावाजा ना मीडियाची गर्दी, अगदी खाजगी पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यात जुबिनने आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.

'द टाइम्स ऑफ इंडिया' रिपोर्टनुसार, जुबिन नौटियालने लग्नासाठी आपले होमटाउन म्हणजेच डेहराडूनची निवड केली. जिथे आजकालचे बॉलिवूड सेलिब्रिटी डेस्टिनेशन वेडिंग आणि ग्रँड सेलिब्रेशनला पसंती देतात, तिथे जुबिनने साधेपणा जपला. जुबिनची पत्नी त्याची बालपणीची मैत्रीण आहे. यावर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याने सोशल मीडियावर एक छोटीशी झलक शेअर केली होती, ज्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते, त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

जुबिनच्या कुटुंबातील एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जुबिनला त्याचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच खाजगी ठेवायला आवडते. त्याला मोठ्या सार्वजनिक उत्सवाऐवजी कुटुंबाच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने लग्न करायचे होते. या सोहळ्याला केवळ कुटुंबातील सदस्य आणि मोजकेच जवळचे नातेवाईक उपस्थित होते. जुबिनला आपल्या आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस प्रियजनांसोबत शांततेत साजरा करायचा होता 

जुबिन नौटियालचे करिअर सध्या यशाच्या शिखरावर असून त्याने आतापर्यंत २०० हून अधिक गाणी गायली आहेत. २०११ मध्ये 'एक्स फॅक्टर इंडिया' या रियालिटी शोमधून त्याने आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती आणि २०१४ मध्ये 'सोनाली केबल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जुबिनच्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. अद्याप जुबिनने अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केलेले नाहीत. ते फोटो पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jubin Nautiyal Secretly Marries Childhood Friend in Uttarakhand Ceremony

Web Summary : Singer Jubin Nautiyal married his childhood sweetheart in a private ceremony in Uttarakhand. The wedding was a traditional affair with close family and friends. He chose his hometown Dehradun, keeping the celebration simple. Fans eagerly await wedding photos on social media.
टॅग्स :संगीतसेलिब्रिटीशुभविवाह