Join us

Brahmastra : “दबाव अच्छा है...”, ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंडवर Jr NTRने बॉलिवूडला दिला कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 18:00 IST

Jr NTR : येत्या शुक्रवारी आलिया भट व रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होतोय आणि या चित्रपटावरही ‘बायकॉट’चं संकट दिसू लागलं आहे. अशात साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरनं बॉलिवूडला एक कानमंत्र दिला आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘बायकॉट बॉलिवूड’चा ट्रेंड सुरू आहे. या काळात बॉलिवूडचे अनेक सिनेमे आलेत आणि या ट्रेंडमुळे पुरते आपटले. येत्या शुक्रवारी आलिया भट व रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra ) रिलीज होतोय आणि या चित्रपटावरही ‘बायकॉट’चं संकट दिसू लागलं आहे. अशात साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरनं (Jr. NTR) बॉलिवूडला एक कानमंत्र दिला आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनसाठी साऊथ स्टार्सचीही मदत घेतली आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये ज्युनिअर एनटीआर सामील झाला. या इव्हेंटमध्ये ज्युनिअर एनटीआरला ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंडबद्दल विचारण्यात आलं. यावर त्याने जबदस्त उत्तर दिलं. ‘दबाव चांगला आहे, हे आव्हान स्वीकार आणि ते पूर्ण करून दाखवा,’ असं तो म्हणाला.

जेव्हा आपण दबावात असतो, तेव्हा स्वत:मधलं बेस्ट देतो, असं मी मानतो. त्यामुळे दबाव चांगला आहे. मी म्हणेल की, फिल्म इंडस्ट्रीने हे आव्हान स्वीकारून प्रेक्षकांना अधिकाधिक चांगले, शानदार सिनेमे द्यायला हवेत. मी इथे कुणालाही कमी लेखू इच्छित नाही. प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम चित्रपट बनवणं, हेच आपलं ध्येय असायला हवं, असं ज्युनिअर एनटीआर म्हणाला.

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या यशाची कामनाही त्याने केली. मी परमेश्वराला प्रार्थना करतो की, ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीतील ब्रह्मास्त्र ठरावा, असं तो म्हणाला. ज्युनिअर एनटीआरच्या यावर्षी रिलीज झालेल्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. एकट्या भारतीय बॉक्स आॅफिसवर या चित्रपटत्तने 274 कोटी कमावले. 

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाबद्दल सांगायचं तर हा सिनेमा येत्या 9 सप्टेंबरला रिलीज होतो आहे. यात रणबीर कपूर व आलिया भट मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हिंदीसह अनेक भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय.

टॅग्स :ज्युनिअर एनटीआरब्रह्मास्त्ररणबीर कपूरआलिया भटबॉलिवूड