अर्शद वारसी(Arshad Warsi)चं नाव ऐकताच त्याच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंग आणि हृदयस्पर्शी व्यक्तिरेखा आठवतात. बऱ्याच काळापासून प्रेक्षकांची मने जिंकणारा अर्शद आता पुन्हा एकदा त्याच्या खऱ्या जॉली अवतारात अॅडव्होकेट जगदीश त्यागीसह परतत आहे. २०१३ मध्ये, जेव्हा अर्शदने मेरठमधील एका देसी आणि जुगाडू वकिलाची भूमिका साकारली होती, तेव्हापासून कोर्टरूम कॉमेडीची दिशा बदलली. आता फ्रँचायझीच्या तिसऱ्या सीझनच्या घोषणेनंतर, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आणि अखेर तो क्षण जवळ आला आहे.
'जॉली एलएलबी ३'(Jolly LLB 3)ची कथा आणखी रंजक असणार आहे, कारण अर्शद वारसीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा समोरासमोर येणार आहेत. दोघांमधील भांडणे आणि वादविवादांमुळे सर्वात जास्त त्रास होणारे आपले लाडके जज त्रिपाठी (सौरभ शुक्ला) आहेत, ज्यांची फक्त एकच तक्रार आहे की, "बस करा दोघांनी!" हुमा कुरेशी आणि अमृता राव चित्रपटात एक मजेदार ट्विस्ट आणण्यासाठी येत आहेत. त्याच वेळी, गजराज राव त्यांच्या कॉमिक टायमिंगने सर्वांचे मन जिंकण्यासाठी सज्ज आहेत. दिग्दर्शक सुभाष कपूर आणि निर्माते आलोक जैन आणि अजित अंधारे या तिसऱ्या भागात तिप्पट हास्य, नाट्य आणि मजा आणत आहेत.
'जॉली एलएलबी ३' कधी होणार प्रदर्शित?निर्मात्यांनी अलीकडेच जॉली एलएलबी ३चा टीझर प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये मेरठचे वकील जगदीश त्यागी उर्फ जॉली आणि कानपूरचे जगदीश्वर मिश्रा उर्फ जॉली दाखवले आहेत. अक्षय कुमार कानपूरच्या जॉलीच्या भूमिकेत दिसत आहे. प्रेक्षकांनी या टीझरला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. जॉली एलएलबी आणि जॉली एलएलबी २ नंतर आता जॉली एलएलबी ३ येत आहे. पहिल्या भागात अर्शद होता, तर दुसऱ्या भागात अक्षय आहे. चित्रपटाचा तिसरा भाग १९ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.