Join us

​जॉन अब्राहमचे मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 18:05 IST

मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूड स्टार जॉन अब्राहम येत्या काही दिवसात दोन मराठी चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचे समजते. याबाबत त्याने काही ...

मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूड स्टार जॉन अब्राहम येत्या काही दिवसात दोन मराठी चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचे समजते. याबाबत त्याने काही दिग्दर्शकांशीही चर्चा केली आहे.  मराठी चित्रपट निर्मितीबाबत गेले काही महिने जॉन अब्राहमने काही दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या भेटी घेतल्या आहेत. काही निष्णांत मंडळींची साथ घेत प्रभावी कथानकाचा शोध घेण्याकडे त्याचा कल असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. चित्रपट कथानकाच्या बाबतीत नेहमीच सारासार विचार करणाºया जॉन अब्राहमच्या निर्मितीत कोणता मराठी सिनेमा साकारणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.