Join us

जोधपूर मध्यवर्ती कारागृहात कैदी नं. १०६ ला भेटण्यासाठी गेली ‘ही’ अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 17:55 IST

सध्या सलमान खान जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असून, त्याच्या भेटीसाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार जोधपूर गाठत आहेत. अशात या अभिनेत्रीनेही जोधपूरला जात त्याची भेट घेतली.

काळवीट शिकार प्रकरणी सुपरस्टार सलमान खानला जोधपूर न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली असून, सध्या तो जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. सलमानला शिक्षा झाल्याचे समजताच बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली असून, अनेक सेलिब्रिटी त्याच्या भेटीसाठी जोधपूरला पोहोचले आहेत. सलमान शिक्षेवर बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, अभिनेत्री प्रिती झिंटा हिने सलमानला भेटण्यासाठी थेट जोधपूर गाठले आहे. खरं तर बॉलिवूडमध्ये सलमानचे बरेचसे मित्र आहेत, मात्र त्याला भेटण्यासाठी प्रिती थेट जोधपूरला पोहोचली आहे.  प्रितीने यावेळी पांढºया रंगाची कॅप घातली होती. त्याचबरोबर स्कार्पने चेहरा झाकून घेतला होता. याप्रकरणात सलमान खानसोबत तब्बू, सोनाली बेंद्र, सैफ अली खान आणि नीलम सहआरोपी होते. सलमान व्यतिरिक्त यासर्वांची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे. सध्या हे सर्वच मुंबईत परतले आहेत. दरम्यान, ‘जानेमन आणि चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटात सलमान-प्रितीची जोडी बघावयास मिळाली होती. यानंतर हे दोघे चित्रपटात झळकले नाहीत. मात्र त्यांच्यातील मैत्री अजुनही कायम असल्याचे प्रितीने जोधपूर येथे येऊन दाखवून दिले.  वास्तविक प्रितीला तिच्या बिंधास्त अ‍ॅटीट्यूडसाठी ओळखले जाते. ती तिच्या आयुष्यात मित्रांविषयी खूपच बोल्ड आहे. दरम्यान, आज सलमानच्या जामीनावर युक्तीवाद होऊन त्याची सुटका होणे अपेक्षित होते. परंतु याबाबतची सुनावणी उद्या ठेवण्यात आल्याने त्याच्या चाहत्यांना आता निकालाची प्रतिक्षा लागली आहे. उद्या सलमानला जामीन होणार की नाही? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांसमोर उपस्थित होत आहे.