Join us

जान्हवी कपूरला कमवायचंय बॉलीवूडमध्ये नाव, आई श्रीदेवीच्या 'या' सिनेमाच्या रिमेकमध्ये काम करण्याचं स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 14:39 IST

सैराटच्या आर्चीला रसिकांनी अक्षरशा डोक्यावर घेतलं. रिंकूने साकारलेल्या आर्चीने रसिकांना वेड लावलं. त्यामुळेच की काय धडकमधील जान्हवीच्या भूमिकेकडून रसिकांना आणि विशेषतः करण जोहर तसंच कपूर कुटुंबीयांना बऱ्याच अपेक्षा आहेत.

'धडक' सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांमधून जान्हवीने रसिकांची मनं जिंकलीच आहेत.त्यामुळे 'धडक' सिनेमाकडून अपेक्षा वाढल्या असून सध्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. 'धडक' हा 'सैराट' सिनेमाचा रिमेक आहे हे साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळेच या अनुषंगाने जान्हवी कपूरला सध्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जातायत. दिवंगत अभिनेत्री आणि बॉलीवूडची चांदनी असणाऱ्या श्रीदेवी यांची लेक असल्याने जान्हवीकडून साऱ्यांनाच खूप अपेक्षा आहेत. (ALSO READ:'धडक'च्या क्लायमॅक्समध्ये रसिकांना बसणार धक्का, असा असेल शेवट….)

त्यामुळेच श्रीदेवी यांच्या गाजलेल्या अनेक सिनेमांपैकी कोणत्या सिनेमाच्या रिमेकमध्ये काम करायला आवडेल असा प्रश्न जान्हवीला एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता श्रीदेवी यांच्या गाजलेल्या 'सदमा' सिनेमाचा रिमेक व्हावा आणि त्यात श्रीदेवी यांनी साकारलेली भूमिका साकारायला आवडेल अशी प्रतिक्रिया जान्हवीने दिली आहे. 'सदमा' सिनेमातील श्रीदेवी यांनी साकारलेली नेहलता आणि कमल हासनचा सोमू रसिकांना भावला होता. त्यामुळेच सदमा सिनेमातील श्रीदेवी यांच्या आव्हानात्मक भूमिका साकारत आईच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं जान्हवीचं स्वप्न आहे.

सध्या बॉलीवूडमध्ये जान्हवी कपूर हिच्या पदार्पणाची सगळ्यात जास्त चर्चा आहे. जान्हवी कपूर धडक या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारत आहे. 'सैराट' या सुपरडुपर मराठी सिनेमाचा रिमेक असलेल्या 'धडक' सिनेमात जान्हवीची प्रमुख भूमिका आहे. सैराटमध्ये रिंकू राजगुरुने साकारलेली आर्ची हिंदीतील धडकमध्ये जान्हवी साकारणार आहे. सैराटच्या आर्चीला रसिकांनी अक्षरशा डोक्यावर घेतलं. रिंकूने साकारलेल्या आर्चीने रसिकांना वेड लावलं. त्यामुळेच की काय धडकमधील जान्हवीच्या भूमिकेकडून रसिकांना आणि विशेषतः करण जोहर तसंच कपूर कुटुंबीयांना बऱ्याच अपेक्षा आहेत.  

श्रीदेवी यांचं फेब्रुवारी महिन्यात निधन झाल्यानंतर कुठेही जाताना जान्हवी गुलाबी बाटली आपल्यासोबत बाळगत असल्याचे समोर आलंय. यावरुन अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. गुलाबी रंग हा जान्हवीचा आवडता रंग असेल आणि त्यामुळेच ती ही गुलाबी बाटली सोबत ठेवत असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. अन्यथा ही गुलाबी बाटली आणि श्रीदेवी यांचं काहीतरी कनेक्शन असेल. त्यामुळेच आईची आठवण म्हणून जान्हवी कायम ती बाटली स्वतःजवळ बाळगत असावी असंही बोललं जात आहे. मात्र या बाटलीचं गुपित खुद्द जान्हवीच उलगडू शकेल किंवा तिच्या निकटवर्तीयांना याची माहिती असावी.

टॅग्स :जान्हवी कपूरधडक चित्रपटश्रीदेवी