Join us
Daily Top 2Weekly Top 5

​या निर्मात्यासोबत जया प्रदा यांचे झाले होते लग्न... पण ते दोघे कधीही राहू शकले नाही एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 13:30 IST

जया प्रदा यांनी केवळ दाक्षिणात्यच नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये देखील त्यांचे एक स्थान निर्माण केले आहे. आज जयाप्रदा यांचा ...

जया प्रदा यांनी केवळ दाक्षिणात्यच नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये देखील त्यांचे एक स्थान निर्माण केले आहे. आज जयाप्रदा यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९६२ ला आंध्रप्रदेश येथे झाला. त्या केवळ १४ वर्षांच्या असताना त्यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. शाळेत असताना एका कार्यक्रमात त्यांनी एक नृत्य सादर केले होते. हे नृत्य एका दिग्दर्शकाने पाहिले आणि त्यांना एका चित्रपटात नृत्य करण्याची संधी दिली. एका दाक्षिणात्य चित्रपटात तीन-चार मिनिटे नृत्य सादर कऱण्यासाठी त्यांना त्यावेळी दहा रुपये मिळाले होते. जया प्रदा यांचे ते नृत्य प्रेक्षकांना प्रचंड आवडले असल्याने त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर यायला लागल्या. त्या केवळ १७ वर्षांच्या असताना दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना व्हायला लागली. दक्षिणेत मिळालेल्या प्रसिद्धीनंतर सरगम या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी बॉलिवूडमध्ये एकामागोमाग एक हिट चित्रपट दिले. त्यांना अनेक चांगल्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या चित्रपटाच्या ऑफर यायला लागल्या. पण सगळे काही सुरळीत सुरू असताना अचानक त्यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाने छापा मारला आणि त्यामुळे त्यांच्या करियरला उतरती कळा लागली. चित्रपटांच्या ऑफरचे प्रमाण कमी होऊ लागले. हा त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ होता. त्याचवेळात निर्माते श्रीकांत नाहटा जया प्रदा यांच्या आयुष्यात आले. त्यांनी या काळात जया प्रदा यांना खूप मदत केली. जया प्रदा आणि श्रीकांत एकमेकांवर प्रचंड प्रेम करत होते. त्या दोघांना लग्न देखील करायचे होते. पण श्रीकांत यांचे लग्न झाले असून त्यांना तीन मुले होती. जया प्रदा आणि श्रीकांत यांच्या प्रेमप्रकरणाची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर त्यांनी काही वर्षांनी लग्न केले. पण श्रीकांत यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नसल्याने त्यांच्या लग्नाला मान्यता मिळाली नाही. श्रीकांतदेखील आपल्या पहिल्या पत्नीसोबत आणि मुलांसोबतच राहात होते. त्यामुळे जया प्रदा यांना लग्न होऊनही एकटेच राहावे लागले होते. जया प्रदा आणि श्रीकांत यांना मुलबाळ नाहीये. त्यामुळे जया प्रदा यांनी त्यांच्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेतले आहे. त्या आपल्या मुलासोबतच अनेक वर्षांपासून राहातात. Also Read : जेव्हा सुपरस्टार राजेश खन्ना यांनी श्रीदेवी आणि जया प्रदाला एकाच खोलीत केले होते बंद...!