जया बच्चन यांचा रेखाला फ्लार्इंग किस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2016 17:15 IST
जया बच्चन आणि रेखा यांच्यातील संबंध कदाचित सुधारलेत. आत्तापर्यंत अमिताभसोबतच्या जवळीकतेपोटी रेखाला कायम अवॉईड करणाºया जया अलीकडे कमालीच्या बदलल्या ...
जया बच्चन यांचा रेखाला फ्लार्इंग किस
जया बच्चन आणि रेखा यांच्यातील संबंध कदाचित सुधारलेत. आत्तापर्यंत अमिताभसोबतच्या जवळीकतेपोटी रेखाला कायम अवॉईड करणाºया जया अलीकडे कमालीच्या बदलल्या आहेत. २०१५ मध्ये एका अवार्ड शोदरम्यान रेखा व जया एकमेकांना अलिंगन देताना दिसल्या होत्या. आता त्याही पुढे जात, जया रेखांना फ्लार्इंग किस देतांना दिसल्या. रविवारी एका अवार्ड शोच्या बॅकस्टेजला हे दृश्य पाहायला मिळाले. रेखा, शबाना आझमी आणि जया बच्चन तिघीही आपआपल्या कारकडे वळत असताना अचानक रेखा व जया यांची नजरानजर झाली. याचवेळी जयांनी रेखांना फ्लार्इंग किस देत बाय बाय केले. जयांच्या या बायबायला रेखांनी हसत हसत प्रतिसाद दिली. विशेष म्हणजे यावेळी अमिताभ काही अंतरावर उभे होते.