Join us

'जलसा' बंगल्याबाहेर रात्रीच्या अंधारात एकट्या फिरताना दिसल्या जया बच्चन, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 11:09 IST

सोशल मीडियावर जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

देशभरात दिवाळीच्या सणाला उत्साह आहे.  लहान-मोठा सर्वच जण प्रकाशाचा हा सण आनंदाने साजरा करताना दिसले. बॉलिवूडमध्येही अनेक कलाकारांनी आपल्या घरी शानदार दिवाळी साजरी केली. अशात मग बच्चन परिवार मागे कसे राहू शकतो. दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन आणि मुलगी श्वेतासोबत लक्ष्मीची पूजा करण्यासाठी 'जलसा'मध्ये पोहोचल्या होत्या.  त्याची एक झलकही समोर आली. आता एक व्हिडीओ समोर आला आहे. 

सोशल मीडियावर जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये जया बच्चन या जलसा बंगल्याबाहेर रात्रीच्या अंधारात एकट्या फिरताना दिसल्या. विशेष म्हणजे यावेळी जया बच्चन यांनी पापाराझींना पाहिल्यावर त्याच्यावर चिडल्या नाहीत. तर शांतपणे चालताना दिसून आल्यात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्यात. 

जलसा बंगल्यावर दरवर्षी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी होते. जया बच्चन या कायम चर्चेत असतात.  अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला ५०पेक्षा अधिक वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना अभिषेक आणि श्वेता ही दोन मुलं आहेत. अभिषेकने ऐश्वर्या रायबरोबर संसार थाटला आहे.  

टॅग्स :जया बच्चनअमिताभ बच्चनदिवाळी 2024