Join us  

“मी बहिरी नाहीये”, पापाराझींवर भडकणाऱ्या जया बच्चन ट्रोल, नेटकरी म्हणाले, “म्हणून अमिताभ बच्चन...”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 11:07 AM

पापाराझींवर पुन्हा भडकल्या जया बच्चन, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, व्हिडिओ व्हायरल

‘कोरा कागज’, ‘कोशिश’, ‘झंजीर’, ‘सिलसिला’ अशा अनेक हिट चित्रपटांत काम करुन जया बच्चन यांनी ७०चं दशक गाजवलं. जया बच्चन यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडिओंमध्ये त्या अनेकदा पापाराझींवर चिडताना दिसतात. जया बच्चन व अभिषेक बच्चन यांनी नुकतीच ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. या दरम्यानचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन जया बच्चन यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत जया बच्चन यांचे फोटो क्लिक करण्यासाठी पापाराझी त्यांना आवाज देताना दिसत आहे. परंतु, जया बच्चन पापाराझींवर ओरडत “मी बहिरी नाहीये” असं म्हणताना दिसत आहेत. जया बच्चन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

'जत्रा'मुळे केदार शिंदेंच्या डोक्यावर झालेलं ९० लाखांचं कर्ज, म्हणाले, "घर, बायकोचे दागिने गहाण ठेवून..."

एका नेटकऱ्याने कमेंट करत “म्हणून अमिताभ बच्चन नेहमी गप्प असतात”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “एवढा अटिट्युड कसला आहे” अशी कमेंट केली आहे. “जेवढे अमिताभ बच्चन यांचे चाहते आहेत. तितकेच मॅडमला लोक नापसंत करतात”, असं एकाने म्हटलं आहे. “रागीट म्हातारी” अशी कमेंटही केली आहे. “रेखावरचा राग दुसऱ्यांवर काढत आल्या आहेत”, असंही एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी जया बच्चन यांनी खास लूक केलेला पाहायला मिळाला. लाल रंगाचा ड्रेस त्यांनी परिधान केला होता. त्यांच्याबरोबर अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांनीही चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी हजेरी लावली होती.

टॅग्स :जया बच्चनबॉलिवूडअभिषेक बच्चन